Tata Power Share : टाटा पॉवर शेअरची झेप; ब्रोकिंग फर्मने दिली चकित करणारी टार्गेट प्राईस

tata power share

Tata Power Share : 17 जानेवारी 2025 म्हणजेच काल जर आपण एकंदरीत शेअर बाजाराची परिस्थिती बघितली तर सुरुवात ही घसरणीने झाली होती आणि मोठ्या घसरणीसह बाजार बंद झाला होता. परंतु असे असताना देखील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र तेजीचे संकेत पाहायला मिळाले व यामध्ये टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर देखील फोकसमध्ये राहिला. या कंपनी शेअरबाबत काही … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे मेट्रोच्या वेळेत झाला मोठा बदल

Pune Metro News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! आता पुणे मेट्रोची वेळ वाढवण्यात आली आहे. वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट या मेट्रो मार्गांवरील शेवटच्या गाड्या रात्री 10 वाजता सुटत असल्या तरी, प्रवाशांच्या मागणीनुसार ही सेवा आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हा बदल जानेवारी 2025 च्या अखेरीस लागू होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना उशिराच्या प्रवासासाठी मोठा दिलासा … Read more

Motilal Oswal Mutual Fund : एक लाखाचे केले तब्बल सहा लाख रुपये ! नोकरदार असाल तर आजच करा गुंतवणूक

गेल्या दहा वर्षांत म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. त्यात मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड हा फंड विशेष लोकप्रिय ठरला आहे. या फंडाने एसआयपीच्या माध्यमातून 24.7% वार्षिक परतावा दिला असून, एकरकमी गुंतवणुकीतून 19.89% परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा फंड उत्तम पर्याय आहे. एक वर्षातील फंडाची कामगिरी मोतीलाल ओसवाल मिडकॅप … Read more

विळद घाटात एमआयडीसी ! लग्नात बुंदी, साकळाईच पाणी डॉ. सुजय विखे पाटील काय काय बोलले ?

अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, “दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील”, असा विश्वास … Read more

हवामान बदलले ! महाराष्ट्रात कसे असेल तापमान ? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वारे आणि उत्तर भारतातील वाढलेला वाऱ्याचा वेग यामुळे महाराष्ट्रात हवामान वेगाने बदलत आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यात थंडीची तीव्रता वाढल्याचे दिसत होते. परंतु आता तापमान वाढू लागल्यामुळे थंडी ओसरली असल्याचे जाणवत आहे. गेला काही काळ ढगाळ हवामान आणि धुके पडल्याने थंडीमध्ये चढउतार होताना दिसत होते. आता मात्र कमाल तापमानात वाढ … Read more

Pune News : पुण्यात ‘पाणी’ पेटणार ; PMC ला नोटीस देण्याचे विखे पाटलांचे आदेश

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे महापालिकेला मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापराबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पाण्याच्या पुनःप्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. १४ टीएमसी कोटा, २२ टीएमसी मागणी पुणे महापालिकेला १४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वापराचा कोटा मंजूर असताना, … Read more

सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले…

Ahilyanagar Politics : अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, “दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम … Read more

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ ! असे आहेत आजचे दर

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याची मागणी वाढली असून, आज (१८ जानेवारी २०२५) सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा दर वाढल्याचे बाजारविश्लेषक सांगतात. त्यामुळे आज सोनं खरेदी करायची असेल, तर किंमती काहीशी जास्त … Read more

शिर्डी येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन दिशा देणारे ठरेल : आ. दाते

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात महायुतीचे चांगले वातावरण निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कटिबद्ध होत आतापासूनच नियोजन करावे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी, संघटन वाढावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शिर्डी येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन हे पक्ष विस्तारासाठी नवी दिशा देणारे ठरेल. असे प्रतिपादन पारनेरचे … Read more

‘त्या’ परिसरात अजूनही चार बिबटे ! वनविभागाने लावले पुन्हा दोन पिंजरे

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील भोरवाडी गावच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या पाच बिबट्‌यांच्या पैकी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (१५ जानेवारी) रात्री जेरबंद झाला आहे. जेरबंद झालेला हा बिबट्‌याचा अंदाजे दीड वर्षाचा बछडा असून अजूनही या परिसरात नर, मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर असल्याचे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले आहे. त्यामुळे … Read more

साईच्या नगरीत आजपासून राष्ट्रवादीचे मंथन शिबीर ! अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती

दिशा विकासाची.. पुरोगामी विचाराची हे ब्रीदवाक्य व नवसंकल्प घेऊन २०२५ या वर्षभरात सामाजिक समता, विकासाच्या वेगवेगळ्या दिशा, पक्ष संघटन मजबूत करणे यासह इतर विषयांवर मंथन करण्याकरिता साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय पदाधिकारी शिबिर आजपासून सुरू होत आहे. या शिबिरास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार … Read more

Ahilyanagar News : नरभक्षक बिबट्या जेरबंद, हल्ल्यात मुलीचा मृत्यू

टाकळी ढोकेश्वर : संगमनेर येथील वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने खडकवाडी येथील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. बिबट्या नर जातीचा आहे. खडकवाडी गावातील गणपती मळा परीसरात या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने शुक्रवारी सकाळपासून युद्धपातळीवर मोहीम सुरु केली होती. अखेर दुपारी ३.३० वाजता त्यास जेरबंद करण्यात यश आले. दरम्यान, त्या अगोदर काल खडकवाडी येथे … Read more

Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?

प्लास्टिक कपामध्ये चहा किंवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात. काही प्लास्टिक कप बिस्फेनॉल सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात, जे पेयांमध्ये विरघळतात व थेट शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये कोणतेही गरम पेय पिणे आरोग्यास हानिकारक आहे. कोणत्याही स्टॉल व बऱ्याच ठिकाणी सध्या प्लास्टिक कप्सचा वापर केला … Read more

शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले

शेवगाव तालुक्यातील जवळपास १० ते १२ गावांना वरदान ठणाऱ्या पैठण उजवा कालव्यातून बुधवार (दि. १६) रोजी कालवा समितीने ठरवून दिलेले चालू हंगामातील दुसरे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जायकवाडी पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव तालुक्यातील असंख्य गावांना विस्थापित व्हावे लागले असून तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीचे काळे भोर क्षेत्र धरणामध्ये गेले असून सुद्धा … Read more

राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे मानवहानी व पशुधन हानीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजीत पवार तसेच तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहून जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करण्याची मागणी पूर्वीच केलेली आहे. सद्यस्थितीत राहुरी तालुक्यात २५० … Read more

Jal Jeevan Mission :जलजीवन योजनेचे भवितव्य धोक्यात ! राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द-चिंचोली जलजीवन योजना सातत्याने अडचणींचा सामना करत असल्याने योजनेचे भवितव्यच पाण्यात गेल्यासारखे वाटत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही योजना राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेची बळी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे कोल्हार खुर्द-चिचोली संयुक्त पाणीपुरवठा योजना केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतून … Read more

‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले

श्रीरामपूर : एमआयडीसी मधील प्रश्नाबाबत आपण गंभीर असून मोठे उद्योग श्रीरामपूरात कसे येतील, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले. येथील एमआयडीसीतील कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत नुकतेच उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार ओगले म्हणाले की, २२० केव्हीचे उच्च दाब वीज स्टेशनचे काम लवकरच चालू होणार असून यासाठी आपण महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव … Read more

Ahilyanagar Crime : युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime : जुन्या भांडणाचा मनात राग धरून ८ जणांनी एका युवकास दुचाकी आडवी घालून शिवीगाळ दमदाटी करीत लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने व दगडाने बेदम मारहाण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भिंगार परिसरात घडली. याप्रकरणी फिर्यादीनुसार पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय संजय हांपे (वय २९, रा. सौरभनगर, भिंगार) हा १० जानेवारीला … Read more