Panjabrao Dakh : राज्यात परतीचा पाऊस (Monsoon) चांगलाच बरसत आहे. काल राजधानी मुंबई तसेच ठाणे परिसरात पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला.

याशिवाय पालघर जळगाव नंदुरबार धुळे पुणे नाशिक या जिल्ह्यातही पावसाची (Rain) हजेरी काल पाहायला मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल पावसाची दमदार हजेरी लागली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. यामुळे तेथील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज राज्यात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. या सदर भागात पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

म्हणजेच या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. निश्चितच सध्या कोसळत असलेला पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. मात्र खरीप हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांना या पावसाचा फटका बसत आहे. सध्या राज्यात सोयाबीन तसेच मका आणि इतर खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे.

अशा परिस्थितीत परतीचा पाऊस या पिकांसाठी घातक ठरत आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व म्हणजेच पंजाब राव यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) नुकताच समोर आला आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांच्या मते, आज नऊ ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. 13 ऑक्टोबर नंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल मात्र 13 ते 15 ऑक्टोबर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

15 ऑक्‍टोबरनंतर राज्यात मात्र पावसाची उघडीप राहणार असल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय राज्यात लवकरच थंडीचे आगमन होणार आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.