Panjabrao Dakh : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाला (Rain) पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Rain) झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार आजपासून राज्यात पावसाचा (Monsoon News) जोर अजूनच वाढणार आहे.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा (monsoon) जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळाली मात्र पुण्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला आहे. यामुळे पुणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राजधानी मुंबई कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार् असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मित्रांनो पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांना या वेळी सतर्क देखील राहावे लागणार आहे.

मित्रांनो राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे. मित्रांनो उत्तर महाराष्ट्रमधील सर्व जिल्हे आणि ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाची मात्र उघडीप राहणार आहे. एकंदरीत हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 22 सप्टेंबर पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. सदर कालावधीत कोसळणारा पाऊस हा भाग बदलत पडणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

मित्रांनो राज्यातील विदर्भातील 11 जिल्ह्यात तसेच राजधानी मुंबई, उत्तर महाराष्ट्र, नासिक, नांदेड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद औरंगाबाद, हिंगोली, अहमदनगर, पुणे सातारा, या जिल्ह्यांमध्ये 16 सप्टेंबर पर्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, या कालावधीत राजधानी मुंबई मध्ये अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे. शिवाय राज्यात 20, 21, 22 या तारखेला देखील पावसाची शक्यता आहे.