Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची (Rain) सुरुवात झाली आहे. ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुट्टीवर गेलेला मान्सून (Monsoon) आता परत हजर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Monsoon News) पडत आहे.

काही ठिकाणी अति मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी कायमच चर्चेत राहणारे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचादेखील सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता समोर आला आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात परतीच्या पावसासंदर्भात देखील अंदाज व्यक्त केला आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसा राहील याबाबत देखील माहिती दिली आहे. एवढेच नाही तर या वर्षी महाराष्ट्रात थंडीला कधी सुरुवात होईल याची देखील बहुमूल्य माहिती हवामान तज्ञ पंजाबराव यांनी आपल्या नवीन हवामान अंदाज दिली आहे.

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज राज्यात राजधानी मुंबई, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, जालना, छत्रपती संभाजी महाराज नगर, परभणी, अहमदनगर, हिंगोली, नाशिक, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड तसेच इगतपुरी या भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. निश्चितच अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला असल्याने शेतकरी बांधवांना सजग राहण्याचे आवाहन केले जात आहे.

याशिवाय पंजाबराव यांच्या मते जायकवाडी धरण आगामी काही दिवसात पुन्हा 100% क्षमतेने भरू शकते. अशा परिस्थितीत जायकवाडी धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठी वसलेल्या गावकऱ्यांना तसेच शेतकरी बांधवांना काळजी घेण्याचे आवाहन यावेळी पंजाबराव यांच्याकडून करण्यात आले आहे. पंजाबराव यांच्या मते उद्यापासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. 17 ते 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर ओसरणार मात्र तुरळक ठिकाणी पाऊस कोसळत राहणार आहे.

उद्यापासून 20 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार मात्र पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. त्यानंतर 21 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असून 24 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार आहे. पंजाब राव यांच्या मते या वर्षी परतीच्या पावसाला 7 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, परतीच्या पावसाचा प्रवास दर वर्षी 17 सप्टेंबर पासून जवळपास सुरू होत असतो.

मात्र यावर्षी परतीच्या पावसाचा प्रवास ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. निश्चितच पंजाबराव यांच्या मते, यावर्षी मान्सूनच्या पावसाचा मुक्काम हा राज्यात वाढणार आहे. तसेच या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन मोठे पाऊस कोसळणार आहे.

ऑक्टोबर मध्ये दिवाळीच्या आसपास महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच नाशिक जिल्ह्यात ही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन पंजाबराव यांनी केले आहे. पंजाबराव यांनी सरतेशेवटी सांगितले की या वर्षी 28 ऑक्टोबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे.