Panjabrao Dakh : आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं नाव अर्थातच पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. मित्रांनो राज्यात, गणेशोत्सवाचा पहिला दिवस वगळता पूर्ण गणेशोत्सव हा कोरडाच गेला.

मात्र तदनंतर महाराष्ट्रात पावसासाठी (Rain) पोषक वातावरण तयार झाले असून संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाची (Monsoon) हजेरी बघायला मिळत आहे. काल आणि परवा राजधानी मुंबई तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील पुण्यात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Monsoon News) झाला.

आज सकाळी देखील राजधानी मुंबईत पावसाचे आगमन झाले असून यामुळे वाहतूक विस्कळीत झाले आहे. दरम्यान पंजाबराव यांच्या हवामान अंदाजानुसार, राज्यात 18 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. 18 सप्टेंबरपर्यंत कोसळणारा पाऊस हा राज्यात भाग बदलत पडणार आहे.

म्हणजे आज एका जिल्ह्यात तर उद्या दुसऱ्या जिल्ह्यात या स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे. या दरम्यान राजधानी मुंबईमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो असा पंजाबराव यांचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

तसेच उत्तर महाराष्ट्र, नासिक, मुंबई नांदेड उस्मानाबाद लातूर सोलापूर औरंगाबाद हिंगोली अहमदनगर पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच 20 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याचे पंजाब राव यांनी वर्तवले आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात आगामी पाच दिवस जोरदार पाऊस कोसळणार आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने या संबंधित विभागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील काही भागात आती मुसळधार पाऊस पडणार आहे. राजधानी मुंबईचा विचार करता पुढील तीन दिवस अतिशय महत्त्वाचे राहणार आहे. पुढील तीन दिवस राजधानी मुंबईमध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

विदर्भात देखील आगामी तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर यवतमाळ या चार जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. आज मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. आज मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोलीत देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.