Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) कमालीची विश्रांती घेतलेली दिसत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) झाला होता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.

विशेषता विदर्भात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अति मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाले होते आणि यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र होते. मात्र ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने चांगलीच दडी मारली आहे. यामुळे राज्यात खरीप हंगामातील पिके सुकत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.

पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 31 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार असून गणरायाचे आगमन आणि पावसाचे आगमन सोबतच होणार आहे. 1 सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी नमूद केले आहे. राज्यात जवळपास सहा सप्टेंबर पर्यंत पाऊस (Maharashtra Rain) कोसळत राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील या भागात कोसळणारा पाऊस (Panjabrao Dakh) 

पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 31 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत पावसाच्या सरी बरसत राहणार आहेत. या कालावधीत राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेश या सर्व विभागात पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते, आजपासून राज्यातील सांगली, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, सातारा, बीड या जिल्ह्यात पाऊस सुरू होणार असून हा पाऊस जवळपास सहा सप्टेंबर पर्यंत कायम राहणार आहे.

एकंदरीत पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो खरे पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिके पाण्याखाली गेली. यापासून जी पिके वाचली ती पिके आता पण काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने करपत असल्याचे चित्र आहे. यामुळे पंजाबराव यांनी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळाला आहे.