Panjabrao Dakh : राज्यात पावसाचा (Rain) जोर थोडा कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस (Maharashtra Rain) आता कुठे ब्रेक घेत असल्याचे चित्र आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात अजूनही जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) बरसत आहे. नाशिक मध्ये काल जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon News) झाला आहे. याव्यतिरिक्त बीड औरंगाबाद बुलढाणा या जिल्ह्यातही पावसाची हजेरी बघायला मिळाली.

शिवाय राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काल नमूद करण्यात आला आहे. राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात झालेल्या पावसामुळे काल वाहतूक कोंडी बघायला मिळाली. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. शिवाय काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड मध्ये झालेल्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.

मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसारख्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. दरम्यान सध्या कोसळत पावसामुळे शेतीपिकांचे अजूनच नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय यावर्षी जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात झाला असल्याने राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.

त्यामुळे राज्यातील काही धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडले जात असल्याने नदीकाठी वसलेल्या गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.

पंजाब रावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 24 सप्टेंबर पर्यंत धो-धो पाऊस बरसणार आहे. यानंतर मात्र राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. शिवाय पंजाब रावांनी आपल्या नवीन सुधारित हवामान अंदाज आज परतीच्या पावसा बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

पंजाबराव यांच्या मते यावर्षी परतीचा पाऊस हा उशिरा सुरु होणार आहे. मित्रांनो खरं पाहता परतीचा पाऊस हा नेहमी 17 सप्टेंबर पासून परतायला सुरू होत असतो. मात्र पंजाब राव यांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षी 7 ऑक्टोबर पासून उत्तर महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.

तसेच पंजाबराव यांनी दिवाळीमध्ये दोन मोठे पाऊस होणार असल्याचे सांगितले असून हा पाऊस मराठवाडा विदर्भ आणि नाशिक जिल्ह्यात बघायला मिळणार आहे. याशिवाय 28 ऑक्टोबर पासून थंडीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.