Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा (Rain) जोर मोठा कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही पाऊस कोसळत आहे. मित्रांनो खरे पाहता जुलै महिन्यात पावसाने अक्षरशः थैमान माजवलं होतं.

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे (Maharashtra Rain) महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यात झालेला अतिवृष्टी सारखा पाऊस (Monsoon) विदर्भात मोठ्या प्रमाणात कोसळला होता. यामुळे विदर्भातील खरीप हंगामातील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत आणि शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.

मात्र ऑगस्ट महिन्यात पहिले दोन आठवडे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची (Monsoon News) उघडीप राहिली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे मराठवाड्यात यंदा पुन्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती बघायला मिळणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी संपूर्ण राज्यात ओळखल्या जाणाऱ्या पंजाबरावांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार(Panjabrao Dakh Havaman Andaj), आज राज्यात पावसाची सर्वत्र उघडीप राहणार आहे.

आज सूर्यदर्शन राहणार असून वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. मात्र, उद्या मराठवाड्यातील लातूर नांदेड तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवला आहे. उद्या उर्वरित महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे.

पंजाबराव यांनी वर्तवलेलं सुधारित हवामान अंदाजानुसार, 30 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप राहील. मात्र 31 ऑगस्ट म्हणजे गणेशोत्सवाच्या प्रारंभी पावसाला सुरुवात होणार आहे. मित्रांनो खरे पाहता गणेशोत्सवाच्या दरम्यान दरवर्षी मोठा पाऊस कोसळत असतो.

अशा परिस्थितीत, पंजाबराव यांनी देखील 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाच्या कोसळधारा सुरु राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, 30 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपल्या शेतीची कामे करून घ्यावी जेणेकरून शेतकरी बांधवाची रखडलेली कामे देखील पूर्ण होतील.