Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देखील राज्यात परतीचा पाऊस (Monsoon) बरसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या मते आज राज्यातील विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची (Monsoon News) शक्यता आहे.

या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी केला आहे. आज कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय आज मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.

दरम्यान पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाज हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj), आजपासून राज्यात 15 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. खरं पाहता 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

ऑक्टोबरपर्यंत राज्यातील मुंबई, नाशिक, विदर्भ, मराठवाडा सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र नाशिक या भागात हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी स्पष्ट केले आहे. या कालावधीत काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळेल तर काही ठिकाणी मात्र अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

यामुळे बांधवांनी आपल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी. सध्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पिकांची शेती जसे की, मका सोयाबीन गहू या पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी लगेचच शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवुन घ्यावा.