Panjabrao Dakh : राज्यात सध्या शेती कामाला मोठा वेग आला आहे. हवामान कोरडे असल्याने शेतकरी बांधव शेती कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. राज्यातील शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामातील सोयाबीन मका तूर कापूस इत्यादी पिकांची काढणी करत असून शेतमाल विक्रीसाठी लगबग करत आहेत.

दरम्यान रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी देखील शेतकरी बांधव सज्ज झाल्याचे चित्र आहे. मात्र आता शेतकरी बांधवांच्या शेती कामाला ब्रेक लागणार असल्याचे समजतं आहे. मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आपल्या हवामान अंदाज यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj) राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार आहे.

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात आठ नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. 8 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील सांगली सातारा सोलापूर आणि नांदेड या चार जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता डख यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

निश्चितच, खरीप हंगामातील पिकांची काढणी होत असताना पावसाचे वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढत आहे. शेतकरी बांधवांना या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार होत असल्याने शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे.

मित्रांनो खरं पाहता खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणाच्या जलाशयात वाढ झाली आहे, शिवाय नदी नाले आणि विहिरी देखील तुडुंब भरल्या आहेत.

यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे जाणकार नमूद करत आहेत. दरम्यान, राज्यात थंडीचा जोर देखील वाढत आहे. थंडीमुळे साहजिकच रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरतो. पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरतो. त्यामुळे शेतकरी बांधवांना शेतीची कामे करताना नियोजन करता येते. मंगेश आहिरे (प्रयोगशील शेतकरी)