Panjabrao Dakh : महाराष्ट्रात सध्या हवामान कोरडे असून शेती कामाला वेग आला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात काल हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

मात्र हा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन कोसळत आहे. एकंदरीत राज्यात सध्या हवामान कोरडे असून थंडीचा जोर वाढत आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग जोमात सुरू आहे. तसेच रब्बी हंगामासाठी आवश्यक पूर्व मशागतीची कामे देखील जोरात सुरू आहेत.

दरम्यान आपल्या हवामान अंदाज यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात येता संपूर्ण आठवडा हवामान कोरड राहणार आहे.

निश्चितच यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. राज्यात हवामान कोरडे असल्याने सोयाबीन समवेतच मका व इतर खरीप हंगामातील काढणीसाठी तयार झालेल्या पिकांची हार्वेस्टिंग देखील जोर धरू लागली आहे. पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना सल्ला देत रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे.

पंजाबराव डख यांच्या मते शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर गहू तसेच हरभरा पिकाची पेरणी करून घेतली पाहिजे. शेतकरी बांधवांनी हरभरा पिकाची पेरणी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत केल्यास त्यांना अधिक उतारा मिळणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. याशिवाय वेळेत गहू पेरणीसाठी शेतकरी बांधवांनी एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गहू पेरणी केली पाहिजे. पंजाबराव यांच्या मते पुढील आठवडा राज्यात हवामान कोरडं राहणार असून थंडीचा जोर वाढणार आहे.

यामुळे खरीप हंगामातील पीक काढणेसाठी तसेच रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी पोषक वातावरण राहणार आहे. वाढत्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार असून यामुळे कांदा पिकासाठी देखील फायदा होणार असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे.

खरं पाहता या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने तसेच परतीचा पाऊस देखील चांगला बरसला असल्याने शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही.

दरम्यान खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र आता खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे.