Pm Kisan Yojana: 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Governmnent) देशातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना देशभरात लागू केल्या आहेत. यामध्ये शेतकरी हिताच्या देखील अनेक योजना आहेतं. या योजनेच्या माध्यमातून देशवासीयांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सरकार करत असते.

शेतकऱ्यांच्या (Farmer) समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पीएम किसान योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी वार्षिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये जमा केले जातात. हे सहा हजार 2000 चा एक हफ्ता याप्रमाणे तीन हफ्त्यातं दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हफ्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

नुकतेच 31 मे रोजी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. ज्यांना हे पैसे मिळालेले नाहीत ते 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून माहिती मिळवू शकतात.

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या या योजनेंतर्गत, 4 महिन्यांच्या अंतराने 2000 रुपयांच्या स्वरूपात शेतकर्‍यांच्या खात्यात 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. तुम्हीही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असाल, तर तुम्ही PM किसान योजनेच्या www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या योजनेची माहिती मिळवू शकता.

या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर येथे लाभदायक स्थितीवर क्लिक करून तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल आणि माहितीवर क्लिक करावे लागेल. या प्रक्रियेद्वारे तुम्हाला तुमच्या हप्त्याची संपूर्ण स्थिती कळेल.

याशिवाय, तुम्ही १८००११५५२६६ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून इतर माहितीही मिळवू शकता. पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, या किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC करणे आवश्यक गरजेचे आहे.

जर एखाद्या शेतकऱ्याने हे केले नाही तर त्याला योजनेचे पैसे दिले जाऊ शकत नाहीत. 11 वा हप्ता देखील मिळणार नाही. तर नक्कीच या योजेनेच लाभ घ्या आणि मिळवा लगेचच 11 हप्ता. निश्चितच पीएम किसान सम्मान निधि योजना साठी पात्र शेतकर्‍यांना यामुळे आता आपल्या हफ्त्याची स्थिती जाणून घेण्यास अजूनच सोपे होणार आहे.