file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कोयत्याचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणार्‍या तीन दरोडेखोरांना पोलिसांंनी अटक केली आहे. आकाश पांडुरंग शिंदे, सागर संजय शिंदे, गणेश रमेश शिंदे (सर्व रा. विळद ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी बायपास शिवारात दरोडेखोरांच्या टोळीने एका ट्रक चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. ट्रक चालकाकडील रोख रक्कम, मोबाईल चोरून नेला होता.

संबंधीत ट्रक चालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना यापूर्वी अटक केली आहे.

तर आता पोलिसांनी अन्य तीन आरोपींना एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींना गुरूवारी न्यायालयासमोर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे ही कामगिरी केली.