अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहा गावात विशेष मोहीम राबवत घोडेगाव येथील दोन जणास एक गावठी कट्टा व एक तलवारीसह अटक करण्यात आली आहे.

करण बाळासाहेब भंडालकर (वय-१९) रा.घोडेगाव व शहारुख उर्फ चाट्या जावेद शेख (वय-३०) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी कि, गुन्हेगारी पार्श्वभूमी व पोलिस रेकाॅर्डवर असलेल्या ५२ आरोपींच्या घराची झडती घेण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक (नगर) सौरभ अग्रवाल,

श्रीरामपुरच्या अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ दिपाली काळे, दोन विभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे व संदीप मिटके यांच्यासह पोलिसांनी शोधमोहीम व झडती मोहीम राबवली. यामध्ये पोलिसांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून शहारुख उर्फ चाट्या जावेद शेख (वय-३०) यास अटक करुन त्याच्या घरातून गावठी कट्टा हस्तगत केला.

तसेच घोडेगाव येथील राहणार करण बाळासाहेब भंडालकर (वय-१९) यास अटक करुन त्याच्या कडून एक तलवार ताब्यात घेण्यात आली. तसेच शनिशिंगणापुर हद्दीतील ९ जणांच्या घराची झडती घेतली मात्र कुठलेही हत्यार अथवा आरोपी मिळाला नाही.