file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- कर्जत पोलीस ठाणे हद्दीत तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड व निखिल राजेद्र पवार (दोन्ही रा. मिरजगांव, ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरजगाव ते बेलगाव रस्ता लगत न्यु इंग्लिश स्कुल जवळ सदरचे दोघे जण इसम त्यांच्याकडे असलेल्या एका मोटार सायकलवरून बेलगावच्या दिशेने जात असलेले दिसले.

त्यावेळी त्यांना कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी व जवान यांनी जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली असता इसम नामे भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड यांचे कब्जात एक लोंखडी मुठ असलेली धारदार तलवार मिळुन आली.

सदर इसमाना ताब्यात घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींवर यापुर्वी जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.