file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करत राहुरी शहरहद्दीत गावठी दारूचे अड्डे उद्धवस्त करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी शहरहद्दीतील राजवाडा परिसरातगावठी दारूचे अड्डे सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक व राहुरी पोलीस पथकाने राजवाडा परिसरात भाऊसाहेब विठ्ठल साळवे व अरूण शामराव साळवे हे राहत असलेल्या घरात छापा टाकला.

दोन्ही ठिकाणी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर तसेच तयार केलेली गावठी दारू असा एकूण एक लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही ठिकाणचे दारूअड्डे उध्वस्त करण्यात आले. या कारवाईत आरोपी भाऊसाहेब विठ्ठल साळवे (वय 55 वर्षे) याला ताब्यात घेतले.

मात्र, आरोपी अरूण शामराव साळवे हा पसार झाला. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राहुरी पोलीस ठाणे व नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.