file photo

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- सध्या जिल्ह्यातील ज्या भागातून मोठ्या नद्या वाहतात त्या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून रात्रीतून वाममार्गाने मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जात आहे.

मात्र या व्यावसायतूनच पुढे अनेक टोळीयुध्द देखील होतात. मात्र कधीकधी पोलिस वाळू तस्करांना चांगलीच अद्दल घडवतात. श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर गावच्या शिवारातील घोड पदीपात्रात वाळू तस्करी करणाऱ्या वाळूतस्करांना बेलवंडी पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

काल केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करत चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर गावच्या शिवारातील घोड पदीपात्रात काहीजण मोठ मोठ्या यंत्राच्या सहाय्याने वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती बेलवंडी पोलिसांना समजली.

त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी काहीजण पोकलेन मशीनच्या सहाय्याने नदीपात्रातून शासकीय मालकीची वाळू ट्रकमध्ये भरून वाहतूक करताना आढळून आले.

त्यावरून पोलिसंानी एक पोकलेन, एक मालट्रक व वाळूसाठा असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सुरेश नागाप्पा मंजुळकर (रा. विकलागर कर्नाटक,हल्ली रा.हिंगणी दुमाला),राहुल वाल्मिकी चौधरी (रा.मोटेवाडी), शरद शहाजी शिंदे व मालट्रकचा एकजण अज्ञात मालक अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.