file photo

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  कोरोनाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. या कारवाईंतर्गत पोलिसांनी आत्तापर्यंत तब्बल सहा कोटी 60 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान नागरिकांनी नियमांचे पालन करावे व कारवाई टाळावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या कालावधीमध्ये सरकारने नागरिकांसाठी नियम जारी केले होते. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे दिसून आलेले आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यामध्ये धडक कारवाई मोहीम हाती घेतली होती.

विना मास्क फिरणारे, सोशल डिस्टंसिंग न पाळणारे तसेच संचार बंदीचे उल्लंघन करणे अशा प्रकारच्या कारवाया केलेल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलिसांनी दोन लाख 19 हजार 365 केसेस दाखल केलेल्या आहेत. ज्यांनी नियमांचे उल्लंघन केलेले आहे अशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते.

19 फेब्रुवारी ते 31 मार्च या अखेरपर्यंत 53 हजार 18 केसेस दाखल करण्यात आल्या असून एक लाख 21 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केलेला आहे. एप्रिल ते 31 मे या काळात 97 हजार 22 केसेस दाखल केल्या असून तीन कोटी 23 लाख 70 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.

तर एक जून ते 25 जून अखेर 35 हजार 17 केसेस दाखल केल्या असून एक कोटी पाच लाख 38 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. तर 26 जून ते आजपर्यंत 34 हजार 308 केसेस दाखल केले असून एक कोटी 39 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. आतापर्यंत पोलिसांनी जिल्ह्यामध्ये सहा कोटी 60 लाख 56 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.