अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- देवळाली प्रवरा येथे शनिवारी राञी झालेल्या घरफोड्या वरुन विद्यमान आमदार लहू कानडे व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याने आ.लहू कानडे यांच्या तक्रारीची दखल घेत.

पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी पोलीस उप निरीक्षक मधुकर शिंदे व पोलीस चौकी अंमलदार साहय्यक पोलीस उप निरीक्षक पोपट टिक्कल यांच्यासह पाच पोलीसांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

देवळाली प्रवरा येथे शनिवारी राञी आठ ठिकाणी दहा ते पंधरा जणाच्या टोळक्याने घरफोड्या केल्या. सोमवारी आ.कानडे यांनी 32 गावांच्या आढावा बैठक घेतली या बैठकीत आ.कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक झाली.

पोलीस निरीक्षक दुधाळ बैठक सोडुन निघून गेले. आ.कानडे यांनी पोलीस उपअधिक्षक मिटके यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेवून मिटके यांनी शुक्रवारी दुपारी आदेश काढुन पोलीस उप निरीक्षक मधुकर शिंदे,

देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे अंमलदार साहय्यक पोलीस उप निरीक्षक पोपट टिक्कल, पो.ना. जानकीराम खेमनार,पो.काँ गणेश फाटक,पो.काँ अमोल पडोळे,पो.काँ किरण ठोंबरे आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

देवळाली प्रवरा पोलीस चौकीसाठी पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ,पोलीस चौकीचे अंमलदार पो.हे.काँ. प्रभाकर शिरसाठ, पो.ना वैभव साळवे,पो.काँ सुरेश भिसे, पो.काँ महेंद्र गुंजाळ, पो.काँ.सागर माळी, पो.काँ.शहामद शेख आदी नविन नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस उपअधिक्षक मिटके यांनी आ.कानडे यांच्या तक्रारी वरुन देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलीसांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. घरफोड्यांच्या तपासात माञ अद्याप हि कोणतीही प्रगती झाली नाही