Ahmednagar Politics : विधानसभेसाठी मोठी रस्सीखेच, लोकसभेला दिलेल्या शब्दांमुळे इच्छुकांची संख्याही वाढली, जगतापांसह लंकेंच्याही जागेवर तीन पक्षांचा डोळा

Ajay Patil
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुका १३ मे ला पार पडल्या परंतु याचा निकाल येण्याआधीच विधानसभेसाठी रस्सीखेच सुरु झालीये. महायुतीमध्ये तीन पक्ष व महाविकास आघाडीतही तीन पक्ष असल्याने कोण कोणत्या जागेंवर दावा करेल हे सांगता येणे कठीण आहे.

त्यातच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला अनेक इच्छुकांना आमदारकीचा शब्द दिलेला असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी देखील डोके ठरेल यात शंका नाही. त्यामुळे विधानसभेला मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

कारण, जागावाटपाआधीच महाविकास आघाडी व महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे विधानसभेला जागा वाटपावरून राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.

भारतीय जनता पक्ष प्रमुख भूमिकेत असलेल्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अन्य सहयोगी पक्ष आहेत. त्याविरोधात महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणूक युती व आघाडीने एकत्र लढविली होती.

यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले. काँग्रेस मात्र एकत्र आहे. लोकसभेच्या निकालात कोणाला काय मिळते? यावर विधानसभेचे गणित अवलंबून आहे.

लोकसभेत चारही पक्षांच्या प्रमुखांनी आपापल्या उमेदवारासाठी जोर लावला होता. काहींनी लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेची पेरणी केली. जिल्ह्यात विधानसभेचे १२ मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडी व महायुतीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. विधानसभेची निवडणूक एकत्र लढल्यास वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार आहे.

कधी होऊ शकते निवडणूक
विधानसभेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारण ओक्टोअबर महिन्यात ही निवडणूक होऊ शकते अशी चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.

कोणत्या जागेसाठी कुणाची मागणी?
दरम्यान एका मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून श्रीगोंदा, पारनेर, नगर शहर, अकोले आणि पारनेरच्या जागेची मागणी केली जाणार आहे, अंतिम निर्णय महायुतीचे नेते एकत्रित घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.
दरम्यान याच रिपोर्टनुसार शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील जागा कायम राहतील, अशी अपेक्षा आहे.

तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार निवडणूक लढविली जाईल असे म्हटले आहे. तर शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे की, विधानसभेला नगर शहर, पारनेर, श्रीरामपूर, संगमनेर या जागांची वरिष्ठांकडे मागणी करणार आहे. जिल्ह्यात शिंदे सेनेला चांगले वातावरण असून, त्यादृष्टीने जागांची मागणी करणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार असून, नगर शहर, संगमनेर, अकोले, राहाता, श्रीरामपूर, श्रीगोंदा या सहा जागांची मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

जगतापांसह लंकेंच्याही जागेवर तीन पक्षांचा डोळा ?
आ. संग्राम जगताप यांचा नगर शहर व माजी आ. निलेश लंके यांचा पारनेर मतदार संघ असून त्या मतदार संघाची इच्छा काँग्रेस, शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील व्यक्त केली आहे. भाजप देखील या जागेची मागणी करू शकेल असे अंदाजही वर्तवला जात आहे. दरम्यान अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe