Amol kolhe : राष्ट्रवादीच्या खासदारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस मैदानात, मोठे काम लावले मार्गी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amol kolhe : नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. असे असताना राज्यातील विरोधी खासदारांनी या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता.

असे असताना मात्र, विरोधकांमधील एकमेव खासदार डॉ. अमोल कोेल्हे या बैठकीला हजर होते. तसेच त्यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. या बैठकीत कोल्हे यांनी पुणे-नाशिक मेगा हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली होती.

असे असताना यामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून पुणे नाशिक मेगा हायस्पीड रेल्वेला तत्वत: मंजुरी देण्यात आल्याचे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

यासाठी गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे आग्रही होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे खासदार कोल्हे यांच्या मागणीला प्रतिसाद देत त्यावर तातडीने निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान, खासदार कोल्हेंच्या भाजपाशी जवळकीच्या चर्चा अधून-मधून सुरू असतात. त्यांनी अनेक भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. यामुळे चर्चा सुरू होत्या.