राजकारण

Bachu Kadu : शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा! बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Bachu Kadu : राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. भाजपा त्यापैकी २४० जागेंवर जर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेनेचा शिंदे गट आणि मित्रपक्षांना फक्त ४८ जागा मिळतील. याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रहारचे जनशक्ती पक्षाला आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले आहे. यामुळे सध्या चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपकडून भाजप २४० जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्रवक्त्यांपुढे केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे मित्रपक्ष नाराज झाले आहेत.

आता बच्चू कडू म्हणाले की, ‘हे त्यांचे व्यक्तिगत आहे. आमची सध्या भाजप, शिंदे गटासोबत युती नाहीये. फक्त पाठिंबा दिलाय. जेव्हा युती होईल तेव्हा पाहू. यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत काय भूमिका असणार हे लवकरच समजेल.

यावरून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे. ते म्हणाले, भाजपाला आमची गरज नसेल, तर स्वतंत्र लढणार, असल्याचे त्यांनी सांगून टाकले आहे. आम्ही भाजपावर अवलंबून नाही. भाजपाला गरज वाटली, तर आम्हाला बरोबर घेतील. नसेल तर आमचा रस्ता वेगळा आहे. भाजपाकडे आम्ही पाच जागांचा प्रस्ताव ठेवला आहे.

जिथे आमची लढण्याची औकात आहे, तेथील जागाच मागत आहोत, असेही जानकर यांनी सांगितले आहे. तसेच एकनाथ शिंदेंबरोबर आघाडी करण्याचे ठरवले असेल, तर त्यांना शुभेच्छा आहेत. आमच्या ताकदीवर ४८ लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे, असेही जानकर यांनी सांगितले. यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office