बाळासाहेब विखे पाटील यांचा जिल्हा परिषद सदस्य ते खासदारकीपर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Balasaheb Vikhe Patil : नगर जिल्ह्यात विखे पाटील घराण्याची चौथी पिढी सक्रिय झाली आहे. गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विजयी पताका फडकवली आहे. सुजय विखे पाटील गेल्यावेळी पहिल्यांदा खासदार बनलेत आणि त्यांनी नगर दक्षिणचे प्रतिनिधित्व केलं. यंदा देखील भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा त्यांना संधी दिलेली आहे.

गेल्या वेळी त्यांनी काँग्रेसमधून भाजपा मध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान आज आपण बाळासाहेब विखे पाटील यांच्या राजकीय प्रवासाबाबत माहिती पाहणार आहोत. बाळासाहेब विखे पाटील यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली ? त्यांना राजकारणात कोणी आणले ? ते खासदार कसे बनलेत याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.

राजकारणात येण्यापूर्वी ते फिटरकी करत

बाळासाहेब विखे यांना राजकारणात लोकांनी आणले आहे. खरंतर राजकारणात येण्यापूर्वी बाळासाहेब फिटरकी करत असत. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र मात्र त्यांची राहणी खूपच साधी होती. यामुळे, त्यांच्या या साध्या राहणीमानाची त्यावेळी देखील खूपच चर्चा व्हायची.

मिळालेल्या माहितीनुसार 1962 मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाली आणि या निवडणुकीत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी निवडणूक लढवावी म्हणून पद्मश्रींना राजी करण्यासाठी आबासाहेब निंबाळकर व एल डी गांधी पद्मश्री यांच्या भेटीस गेले. परंतु पद्मश्रींनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दाखवला. यानंतर मग निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

या बैठकीत गावकऱ्यांनी बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे असे मत नमूद केले. मग काय बाळासाहेब यांची राजकारणात इंट्री झाली आणि निवडणुकीत त्यांनी यश संपादन केले. ते जिल्हा परिषदेचे सदस्य झालेत. तसेच त्यांना उपाध्यक्षपदही मिळाले. म्हणजेच निंबाळकर यांनी बाळासाहेब विखे पाटील यांना राजकारणात आणले.

परंतु बाळासाहेब राजकारणात यावे ही तेथील जनतेचीच इच्छा होती. जिल्हा परिषदेपासून बाळासाहेब यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पुढे 1971 मध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघ ऐवजी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

बाळासाहेब यांनी आपल्या चरित्रात असे म्हटले आहे की अण्णासाहेब खूप मोठे नेते होते 1962 आणि 67 मध्ये ते कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र जनसंपर्क ठेवण्यात ते अपयशी ठरलेत. यामुळे निवडणूक लढवणे थोडेसे अवघड जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली. अण्णासाहेब यांनी 1971 मध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

अण्णासाहेब यांनी कोपरगाव सोडून अहमदनगर लोकसभा लढण्याचा निर्णय घेतल्याने आता कोपरगावमधून कोणाला तिकीट द्यायचे हा प्रश्न उभा झाला होता. खताळ, पाटील, शंकरराव काळे ही सारी मंडळी राज्याच्या राजकारणात खुश होती. त्यांना संसदेत जाण्यात फारसा रस नव्हता. त्यामुळे बाळासाहेब यांचे नाव कोपरगाव लोकसभा मतदारसंघासाठी पुढे आले.

मात्र त्यावेळी बाळासाहेबांना निवडणुकीत उभे करायचे आणि त्यांचा पराभव कसा होईल असा डाव प्रस्थापितांनी आखला असल्याची शंका बाळासाहेब यांना होती. विशेष म्हणजे त्यावेळी नगरची बहुतेक नेते मंडळी यशवंतराव चव्हाण यांना बाळासाहेब निवडून येण्याची खात्री नाहीये यामुळे त्यांना तिकीट देऊ नका अशी म्हणत होती.

परंतु यशवंतराव चव्हाण यांनी बाळासाहेब यांना उभे करू, बघू निकाल काय लागतो ते असं म्हणत बाळासाहेबांनाच संधी देण्याचा निर्णय घेतला. मग काय बाळासाहेब यांनी ती निवडणुक लढवली अन त्या निवडणुकीत त्यांनी विजय देखील मिळवला. अशा तऱ्हेने बाळासाहेब कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत गेलेत.