लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे संकल्प पत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे.जनतेच्या सूचानामधून तयार झालेला जाहीरनामा देशाच्या व प्रगतीसाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी केलेला संकल्पच असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
बुथ सक्षमीकरण अभियानाच्या निमिताने तालुक्यातील मनोली रहीमपूर कोल्हेवाडी आणि जोर्वे येथे आयोजित केलेल्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्राचे स्वागत करून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या संकल्प पत्रामध्ये सामान्य माणसाच्या कल्याणासाठी योजनांची हमी प्रधानमंत्र्यांनी दिली असल्याचे सांगितले.
मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला.यासाठी योजनारूपी कवच केंद्र सरकारने दिले.सर्व योजना अविरतपणे सुरू आहेत.योजनांचा लाभ लाभार्थीना थेट मिळत असल्याने योजनेतील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाने आपल्या संकल्प पत्रात सध्या सुरू असलेल्या योजना पुढे घेवून जाण्याचा निर्धार केला आहे.पण सतर वर्षावरील जेष्ठ नागरीकांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपायांच्या उपचाराचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.मोफत धान्य योजना सुरू ठेवण्याची ग्वाही संकल्प पत्रात देण्यात आली असून महीला बचत गटाकरीता सुरू करण्यात आलेल्या लखपती दिदि योजनेचा विस्तार करुन ३कोटी महीलांना लखपती दिदी बनविण्याचा महत्वपूर्ण संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाने केला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली औद्यगिक गुंतवणूक देशात मोठ्या प्रमाणात येत आहे.भारत देश आज गुंतवणुकी करीता सुरक्षित वाटत असून उत्पादन निर्मीती बरोबरच रोजगाराची उपलब्ध करून देण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचै विखे पाटील यांनी सांगितले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी झाली आहे.प्रत्येक तालुक्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविला गेल्याने त्याच लाभ सर्वसामान्य जनतेला झाला.महायुती सरकार सतेवर आल्यानंतर नगर जिल्ह्यात तीन औद्यगिक वसाहती करीता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यात आल्या.
याठिकाणी उद्योग येण्यास प्रारंभ होणार असून जिल्ह्यातील दहा ते पंधरा हजार युवकांना रोजगाराची संधी मिळेल.एक रुपयात पीक विमा योजना आणि दूध उत्पादकांना पाच रूपये अनुदान देण्याचे आश्वासन महायुती सरकारने प्रत्यक्ष कृती करून पूर्ण केले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनाही प्रचारात भरघोस पाठींबा मिळत असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील आणि खा.सदाशिव लोखंडे यांचा विजय होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.