निलेश लंके यांनी ह्या ४ तालुक्यात मिळविली आघाडी ! भाजप नेत्यांच्या मतदारसंघात लंकेची ‘हवा’

Ahmednagarlive24
Published:
lanke

नगर दक्षिणमध्ये अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी अखेर बाजी मारली आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी आमदार नीलेश लंके यांच्यातील ही लढत अखेर निलेश लंके यांनी जिंकली.

कोविड सेंटरमुळे राज्यात झालेला लौकिक आणि भाजप सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेला रोष या सर्व बाबी लंके यांना विजयाकडे घेऊन गेला, इंग्रजी-मराठीचा वाद, प्रशासनाचा गैरवापर, कांदा, दुधाचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेला संताप लंके यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला.

लंके यांची दिवसरात्र मेहनत घेत आपला विजय सुकर केला. लंके हे जुने साथीदारांनी त्यांना मदत केली. देवदर्शन, शिवसंवाद यात्रा, जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजी महाराज महानाट्याच्या माध्यमातून लंके यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी त्यांना फायद्यात पडली

लंके यांना तीन मतदारसंघात आघाडी
निलेश लंके यांना पारनेर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड या तीन विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे यातील पारनेर वगळता बाकी दोन्ही मतदारसंघ भाजप आमदारांचे आहेत.

अहमदनगर शहर, राहुरी व शेवगाव-पाथर्डी या तीन मतदारसंघात विखे यांना आघाडी आहे. मात्र त्या आघाडीवर लंके यांनी इतर तालुक्यांतून मात केली. अहमदनगर शहरात लंके यांना मुस्लिमबहुल भागात मोठे मताधिक्य मिळाले. विखे यांना नगर शहरातून ३१ हजार मतांचेच मताधिक्य मिळाले. लंके यांनी ग्रामीण भागात चांगली बांधणी केली होती. त्याचा त्यांना फायदा झाला, असे दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe