Rahul Kul : 500 कोटींचा गैरव्यवहार आहे खरा? राहुल कुलांना निलंबित करा, आता भाजप पदाधिकाऱ्याचीच मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rahul Kul : पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे.

असे असताना आता भाजपचे पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी मोठी मागणी केली आहे. ते म्हणाले, राहुल कुल भाजपचे आमदार असले म्हणून काय झालं, त्यांना काय भ्रष्टाचार करायचं लायसन्स दिलं आहे का? आमदार कुल यांना भारतीय जनता पक्षाने निलंबित करावे आणि चौकशी करून त्यांनी हडपलेला पैसा वसूल करावा, असे ते म्हणाले.

हा कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या संबंधीत आहे. ते या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. यामुळे आता चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी देखील याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

थोरात म्हणाले, कुल अध्यक्ष असलेल्या भीमा पाटस कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे १७९ कोटी रुपये थकलेले आहेत. बॅंकेचे पैसे भरल्याशिवाय कारखाना चालू करणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता.

असे असताना कुलांनी कुठलाच शब्द पाळला नाही, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार रमेश थोरात यांनी केली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार केला आहे.

त्यांची ईडी, सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीचे पत्र राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरवर ट्विट करत आज राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घ्या, असाही सल्ला खासदार राऊत यांनी केला आहे. जनतेच्या पैशाची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे.

हे सर्व प्रकरण ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भिमा सहकारी साखर कारखान्यातील घोटाळेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण हे सरळसरळ ५०० कोटींचे मनी लॅंडरींग असल्याचा आरोप केला आहे.