Sharad pawar : पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव! फडणवीसांनंतर अजून एका माजी मंत्र्यांचा थेट आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sharad pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या संमतीनंच सगळ झाले होते, असा दावा फडणवीस यांनी नुकताच केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

यावर रयत क्रांतीचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथ विधी होऊ शकत नाही, कारण अजित दादा निर्णयच घेऊ शकत नाहीत, असे खोत म्हणाले, तसेच खोत यांनी शेतराखणीचे उदाहरण देत पवारांवर निशाणा साधला आहे.

पवारसाहेबांनी फडणवीस आणि भाजपवाल्यांना सांगितले की मी येतो तुमच्या बरोबर. अजितदादा येतील, घ्या उद्या शपथविधी. राष्ट्रपती राजवट उठवली आणि ‘राखण्या’ गेला की बरोबर दुसऱ्या दिवशी पवारसाहेबांनी शिवसेनेला आणि काँग्रेसला घेऊन सरकार बनवले, असेही खोत म्हणाले.

दरम्यान, ज्याची सर्वांना उत्सुकता होती, तो पहाटेच्या शपथविधीबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी आज अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीची कल्पना शरद पवारांना होती, असे म्हटले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

तसेच अजित पवार बोलले तर मी अजून बोलेन असेही ते म्हणाले. यावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहेत. सभ्य माणूस आहेत. ते असत्याचा आधार घेऊन अशी वक्तव्य करतील, असं मला कधी वाटलं नाही.

तसेच फडणवीसांनी कोणत्या अधारावर विधान केले असेल, असे शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर फडणवीसांनाच विचारा, यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.