Positive News: इच्छा असेल तर मार्ग दिसतोच ही म्हणं आपल्याकडे खूप प्रचलित आहे. ही म्हणं हरियाणातील एका शेतकऱ्याच्या (Farmer) मुलाने तंतोतंत खरी करवून दाखवली आहे. पट्ठ्याने आपल्या तुटलेल्या मोबाईलमध्ये तब्बल तीन अँप्लिकेशन (Mobile Application) तयार करून सर्व्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

हरियाणा राज्यातील (Hariyana) एका 12 वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या या कामगिरीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book of World Records) मध्ये आपले नाव देखील कोरले आहे. कार्तिक जाखड (Karthik Jakhar) नामक हा शेतकऱ्याचा पोरगा हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये सध्या शिक्षण घेत आहे.

या शेतकऱ्याच्या पोराची सध्या हरियाणा पासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र चर्चा रंगली आहे. या मुलाने आपल्या कामगिरीमुळे लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले असून या मुलावर चहुबाजूने कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

दिल्लीपासून शंभर किमी अंतरावर असलेल्या हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील मौजे झसवा येथे राहणाऱ्या 12 वर्षीय कार्तिक जाखडनें तुटलेल्या मोबाईल फोन मध्ये तीन ऍप्लिकेशन तयार करण्याची किमया साधली आहे. त्याने केलेल्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. कार्तिकनें तब्बल तीन लर्निंग अॅप्स विकसित केल्या आहेत.

विशेष म्हणजे कार्तिकने यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही, यामुळे विना प्रशिक्षण मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्तिकनें केवळ मोबाईलवर व्हिडिओ पाहून अॅप्स तयार केले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कार्तिकने ज्या फोनद्वारे कोडिंग शिकून अॅप्स बनवले आहेत, त्या मोबाईलची स्क्रीन देखील तुटलेली होती.

निश्चितच कार्तिकने तुटलेल्या फोनमध्ये कोडिंग शिकून तीन लर्निंग ॲप्स बनवले आहेत आणि ही एक कौतुकास्पद बाब आहे. मित्रांनो कार्तिक एक शेतकरी पुत्र आहेत, त्याचे वडील अजित सिंह आज देखील शेती करतात. कार्तिकला तीन बहिणी आहेत, ज्यात तो सर्वात लहान आहे.

कार्तिकच्या घरात अभ्यासासाठी टेबल खुर्ची नाही आणि झसवा गावात चोवीस तास विजेची सोय देखील नाही. मात्र जर यशाला गवसनी घालायची असेल तर विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागतो. कार्तिक ने देखील विपरीत परिस्थितीचा सामना करत ही कामगिरी करून दाखवली आहे.

ऑनलाइन क्लास घेत अॅप तयार केले

कार्तिक सांगतो की, तिसरीपासूनच त्याला काहीतरी वेगळं आणि जरा हटके करण्याची इच्छा होती. कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या, त्यानंतर वडिलांनी ऑनलाइन क्लासेससाठी 10 हजारांचा अँड्रॉइड फोन आणला होता. अभ्यास केल्यानंतर कार्तिकने यूट्यूबवर कोडिंग आणि अॅप डेव्हलपमेंटबद्दल बघितले. याची त्याला आवड देखील निर्माण झाली.

मग काय YouTube वरूनच स्वत:च प्रशिक्षण घेऊन त्याचे स्वतःचे अँप्लिकेशन तयार केले. अॅप बनवतानाही त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कारण फोन हँग व्हायचा आणि कार्तिकला पुन्हा पुन्हा कोडिंग करावं लागायचं.

कार्तिकने बनवलेले हे तीन लर्निंग अॅप्स आहेत

पहिले अॅप जनरल नॉलेजशी संबंधित आहे ज्याचे नाव ल्युसेंट जीके ऑनलाइन आहे, दुसरे अॅप श्री राम कार्तिक लर्निंग सेंटर आहे. ज्यामध्ये कोडिंग आणि ग्राफिक्स डिझायनिंग शिकवले जाते आणि तिसरे अॅप डिजिटल शिक्षणाशी संबंधित आहे, ज्याचे नाव आहे श्री राम कार्तिक डिजिटल एज्युकेशन.

या लर्निंग अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून ते एका संस्थेत सहभागी होऊन सुमारे 45 हजार गरजू मुलांना मोफत ऑनलाइन शिक्षण देत आहेत. निश्चितच कार्तिकनें केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे आणि या शेतकऱ्याच्या पोराची सध्या सर्वत्र चर्चा बघायला मिळत आहे.