file photo

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- महावितरणच्या गलथान कारभाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य व शेतकरी यांना बसतो. पावसाच्या लहरीपणामुळे आधीच अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकेत घोंगावत आहे.

त्यामुळे यापूर्वी महागडी खते बियाणे, औषधे वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या विहिरीत असलेल्या थोड्याफार पाण्यावर पिके जगवण्यासाठी शेतकरी धडपडत आहे.

मात्र येथे त्याला परत वीजवितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या राज्य कोकणात झालेल्या अतिवृष्टीमोठीमुळे त्या भागात मोठा पूर आला होता.

या पुरात वित्तहानी व प्राणहानी देखील झाली, तर अनेकजण बेघर झाले, अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत.त्यात परत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहेच.

यापूर्वी केलेल्या लॉकडाउनमुळे उद्योग बंद पडले आहेत. यात शेतकऱ्यां ची पिके ऐन जोमात असताना वीज कंपनी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करतात.

आता तर पाथर्डी तालुक्यातील भगवान गड परिसरात चोवीस तासापासून विद्युतप्रवाह खंडीत आहे, या संदर्भात खरवंडी कासार ग्रामस्थांनी याबाबत माहिती घेतली असता पाऊस झाला असून मुख्यवाहिनीची तार तुटल्याचे महावितरण अधिकाऱ्याने सांगितले.मात्र महावितरण कंपणीचे विजबिल थकल्यास विज पुरवठा खंडीत केला जातो.

मग बील भरल्यानंतर ग्राहकांना विनालंब सेवा मिळणे ही गरजेचे आहे . पाथर्डीत तब्बल २४ घंटे भगवानगड परिसरास वेठीस धरले . महावितरणे मान्सून पूर्व तयारी केली नाही का? महावितरण अधिकाऱ्यांचे पथकाला वसुली करायचे जमते मग अखंडीत विद्युत पुरवठा देणे जमत नाही का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.