Pune Aurangabad Expressway : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागाला जोडणारा आणि भारतमाला परियोजनेअंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या महामार्गापैकी एक मुख्य हा मार्ग अर्थातच पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग. पुणे-औरंगाबाद महामार्ग ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे कॉरिडॉर राहणार आहे. यामुळे या महामार्गात पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे मोठे बारीक लक्ष लागून आहे.

या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया सध्या पुणे जिल्ह्यात सुरू असून अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्र लिहून भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्याबाबत परवानगी मागितली होती आणि प्राधिकरणाने त्यांना अनुमती देखील दिली.

मात्र अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तत्सम निर्णय घेतलेला नसून सदर जिल्हाधिकारी अधिसूचनेची वाट पाहत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात या दोन जिल्ह्यातही भूसंपादनाची कामे जोरावर सुरू होणार आहेत. दरम्यान आता या महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या महामार्गाच्या रूट मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आज आपण या महामार्गाच्या मार्गात कोणत्या ठिकाणी बदल झाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

अहमदनगर जिल्ह्यात झाला मोठा बदल 

पुणे जिल्ह्यात कुकडी नदी ओलांडल्यानंतर हा रस्ता हलकासा डाव्या बाजूस वळण घेत असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर हिंगणी दुमाला मध्ये प्रवेश केल्यानंतर हा रस्ता आपला जुना रूट कंटिन्यू करतो. त्यानंतर खरातवाडी मध्ये हलकासा डाव्या बाजूला वळाल्यानंतर पुढे ढवळे वस्तीवर हा रस्ता आपला मुख्य मार्ग सोडून डाव्या बाजूने मार्गक्रमण करतो ही स्थिती पुढे पाडळी रांजणगाव ते कळमकर वाडी पर्यंत कायम राहत असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे.

यानंतर खिंड बाबुर्डी मध्ये हा रस्ता आपल्या पूर्वपदावर येत असल्याचे सांगितले गेले आहे. त्यानंतर थेट शिरढोण मध्ये थोडा उजवी बाजूने वळण घेऊन पुढे पारगाव भातोडी मध्ये हलकासा डाव्या बाजूने वळण घेऊन नंतर आपल्या पूर्व पदावर येत आहे. यानंतर पुढे करंजी घाटामध्ये देखील रस्त्यात बदल झाला आहे. माणिक पीर बाबा दर्ग्याला डाव्या बाजूने वळसा घेत थेट प्रभू पिंपरी मध्ये डाव्या बाजूने हलकासा चेंज नवीन अलाइनमेंट मध्ये दाखवण्यात आला आहे.

त्यानंतर पुढे वडगाव मध्ये मात्र हा रस्ता उजव्या बाजूने 200 मीटर ते 1500 मीटर पर्यंत हा रस्ता सरकला आहे. या बदल झालेल्या मार्गाची एकूण लांबी 20 ते 25 किलोमीटर असून खूप मोठे वळण घेत असल्याचे नवीन अलाइनमेंट वरून उघड होत आहे. पुढे हा मार्ग कोळगाव, वरखेड, बेळगाव, प्रभू वडगाव, खडके, मडके, दादेगाव जहागीर ते थेट गोदावरी नदीपर्यंत आपली दिशा बदलत आहे.