अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- प्रेमप्रकरणातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर येवून पिस्टलने गोळीबार केला. हा धक्कादायक प्रकार दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर या परिसरात झाला आहे.

याघटनेत तरुण जखमी झाला असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर येथे शुभम राजु जवळकर (वय-23) यास शुभम यादव (रा.स्मशानभुमीजवळ श्रीरामपूर)

याने त्याचे साथीदारासह एका दुचाकीवरून येवून शुभम जवळकर वर गोळी झाडली. सदर गोळीबारात शुभम राजु जवळकर जखमी झाला असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात केले. नेमकं प्रेमप्रकरण काय आहे? शुभम राजु जवळकर याचे एक मुली बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सदर मुली सोबत आरोपी शुभम यादव याचे प्रेम प्रकरण चालू होते.

त्यामुळे सदर मुलीवरुन दोघामध्ये यापूर्वी वाद झालेले होते. त्याचा राग मनात धरुन शुभम यादव याने गोळीबार करुन शुभम जवळकरला जिवे मारण्याचा डाव आखला होता. दरम्यान या घटनेची माहिती कळताच पोलीस पथकाने बारा तासाच्या आतच सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम राजकुमार यादव, मयुर दिपक तावर (वय 18) यांना अटक केली आहे.

सदर गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे. सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे हे करित आहेत. याप्रकरणी श्रीारमपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये शुभम राजकुमार यादव, मुयर दिपक तावर या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.