file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-   नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण 60 टक्के भरण्याच्या जवळपास पोहचले आहे. २६ हजार दलघफूट पाणीसाठवण क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा वाढतो आहे.

तसेच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास हे धरण 100 टक्के भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाणलोटात अधूनमधून धो-धो पाऊस कोसळत असल्याने मुळा नदीतील विसर्ग कमी अधिक होत आहे. शुक्रवारी सकाळी या नदीतील कोतूळ येथील विसर्ग 10026 क्युसेक होता.

त्यात काहीशी घट होत तो सायंकाळी 9393 क्युसेक झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू असल्याने आज धरणात पाण्याची चांगली आवक होणार आहे. भंडारदरा पाणलोटातही पावसाचा जोर सुरू आहे.

काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 9148 (82.87 टक्के) होता. काल दिवसभरात 57 मिमी पाऊस पडला. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 1262 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे.