अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव समोर आले आहे. द्रविडनं अखेर हेड कोच होण्यासाठी मान्यता दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार काल दुबईत झालेल्या आयपीएल फायनल सामन्यादरम्या बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआचा अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राहुल द्रविडसोबत बैठक केली.

रवी शास्त्रींचा वारसदार म्हणून द्रविडचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं. याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर द्रविडनं हा प्रस्ताव मान्य केला आहे. द्रविडसोबत सुरूवातीला 2 वर्षांचा करार करण्याच येणार आहे.

बीसीसीआयनं फक्त मुख्य कोचचाच निर्णय घेतलाय असं नाही तर बॉलिंग कोचचीही निवड केलीय. पारस म्हांब्रेला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त करण्यात आलंय. पारस हा राहुल द्रविडचाच विश्वासू मानला जातो.

सध्या विक्रम राठोड हे बॅटींग कोच आहेत. तेच कायम रहातील. तर फिल्डींग कोच असलेल्या आर. श्रीधरण यांना बदलायचं की नाही किंवा त्यांच्या रिप्लेसमेंटबद्दल अजून कुठला अंतीम निर्णय झालेला नाही.

टीम इंडियाला पुढं घेऊन जाणारा कोच बीसीसीआयला हवा होता. आणि गांगुली आणि शाहला राहुल द्रविडशिवाय तसा मजबूत पर्याय सापडणं शक्यच नव्हतं. त्यामुळेच टीम इंडियाची कमान एका लिजेंडरी खेळाडूच्या हाती गेलीय म्हणायला हरकत नाही.