file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- पुष्य नक्षत्रा पाठोपाठ २ ऑगष्टला सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्रातील तिसरा दिवस देखील कोरडा गेल्याने पावसाची हुलकावणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक ठरली.

ऑगष्ट महिन्यापासून सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्रात पावसाचे आगमन होईल, असा संदेश हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पुष्य नक्षत्रातील १५ दिवस कोरडे गेले.

पावसाने बुधवारी तिसऱ्या दिवशी देखील हूल दिली. १ जानेवारी ते ४ ऑगष्ट या कालावधीत राहुरी २३८ मिलीमीटर, मुळा नगर २४१ मिलीमीटर, वांबोरी २८२ मिलीमीटर, कोतूळ २११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत हा पाऊस निम्म्याने कमी झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १६ हजार ५२१ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ६३.५० टक्के भरले. सायंकाळी कोतूळकडून मुळा धरणात ३ हजार ८२२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी १७९३.१० फूटापर्यंत पोहोचली होती. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणी साठ्याची १२ हजार १९७ दशलक्ष घनफूट नोंद होती.