अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :-  राज ठाकरे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते,

मात्रा आता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या आईचा करोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना करोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. त्यामुळे चाचणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

राज ठाकरेंच्या मातोश्रींनी आज सकाळीच लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे.

राज ठाकरे आणि त्यांच्या आई या दोघांना करोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मात्र, राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना करोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.