अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व राहुरी-नगर मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये भंडारदारा परिसरात मैत्रिपूर्ण कुस्तीचा डाव चांगलाच रंगला होता.

याची नगर जिल्हाभर जोरदार चर्चा चालू आहे. जिल्हा बॅंकेच्या बैठकीनंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शेळके ,

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व इतर संचालक अशा सर्वांनी मिळून भंडारदरा येथे पर्यटन केले.त्यावेळी भर पावसात हा मैत्रीपूर्ण कुस्तीचा डाव या दोन नेत्यांमध्ये रंगला होता. शेवटी ही कुस्ती बरोबरीत सुटली.