Property Investment Tips: मालमत्ता विकत घेऊन पैसे कमवायचे असतील तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा! मिळेल लाखोत फायदा

Ajay Patil
Published:
investment in real estate

Property Investment Tips:- सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारामध्ये उपलब्ध असून गुंतवणुकीची सुरक्षितता आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणारा परतावा या बाबी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूकदार गुंतवणूक पर्यायांची निवड करतात. यामध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना आणि सरकारच्या अनेक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते.

परंतु या पर्यायाव्यतिरिक्त रिअल इस्टेट म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणे हा एक उत्तम असा पर्याय गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगला पैसा मिळवण्यासाठी फायदेशीर व्यवहार मानला जातो. कारण आपल्याला माहित आहे की कुठलीही प्रॉपर्टीची किंमत ही कालांतराने वाढत असते.

त्यामुळे बरेच गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी एखादे घर किंवा प्लॉट, गाळा विकत घेतात व भविष्यकाळात दुप्पट नफा मिळेल या अपेक्षेने गुंतवणूक करतात. परंतु तुम्हाला जर अशा पद्धतीने गुंतवणुकीतून पैसे मिळवायचे असतील तर प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी किंवा विकत घेण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर फायदा तर दूरच परंतु नुकसान होण्याची शक्यता वाढेल.

 प्रॉपर्टी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

1- प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी लोकेशन पाहणेतुम्ही घर, दुकान किंवा एखादा प्लॉट खरेदी करत असाल तर त्याचे लोकेशन म्हणजेच स्थान योग्य ठिकाणी असणे खूप गरजेचे आहे. कारण भविष्यातील त्या प्रॉपर्टीची मागणी आणि किंमत ही त्या प्रॉपर्टीच्या लोकेशनवर ठरत असते.

त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करताना चांगल्या ठिकाणी खरेदी करावी. खास करून झोपडपट्टी सारखा परिसर असेल तर अशा परिसराजवळ कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करणे जवळपास टाळावे. तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्या ठिकाणापासून हॉस्पिटल, शाळा किंवा इतर महत्वाचे ठिकाणे किती अंतरावर आहेत ते पाहून प्रॉपर्टी खरेदी करावी.

2- मूलभूत सुविधा बघणे तुम्हाला ज्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे त्या ठिकाणी पाणी तसेच वीज इतर आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याची व्यवस्थित माहिती घ्यावी. तसेच जवळपास पार्क, एखादी शॉपिंग सेंटर,

शाळा, हॉस्पिटल यासारख्या सुविधांची माहिती घ्यावी. कारण जर तुम्ही आज प्रॉपर्टी खरेदी केली व भविष्यात त्या प्रॉपर्टीच्या विक्रीतून तुम्हाला चांगला नफा मिळवायचा असेल तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.

3- प्रॉपर्टीची कायदेशीर स्थिती बघणे तुम्ही फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करत असाल तर त्याची कायदेशीर स्थिती किंवा त्याच्यावर कुठले कायदेशीर प्रकरण कोर्टात प्रलंबित तर नाही ना याची माहिती करून घ्यावी. मालमत्तेचे शीर्षक स्पष्ट असणे गरजेचे आहे.

त्यामुळे त्या ठिकाणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून योग्य त्या आवश्यक परवानगी घेणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये जर तुम्ही खरेदी केलेल्या प्रॉपर्टी संबंधित कुठलाही प्रकारचे वाद नसतील तर अशी मालमत्ता पटकन विकली जाते व त्या माध्यमातून नफा देखील जास्त मिळतो.

4- बिल्डरची व्यवस्थित माहिती घेणे समजा तुम्ही ज्या बिल्डर कडून किंवा ज्या बिल्डरने गृहनिर्माण संस्था उभारले आहे त्या संस्थेत मालमत्ता खरेदी करत असाल तर त्या बिल्डरबद्दल किंवा त्याच्या प्रतिष्ठेबद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे. प्रसिद्ध आणि नामांकित असलेल्या बिल्डरने विकसित केलेल्या सोसायटीमध्ये मालमत्ता खरेदी करणे फायद्याचे ठरते.

5- या व्यवहारातून बाहेर पडण्याची प्लॅनिंग करून ठेवणे जेव्हा तुम्ही रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतात. तेव्हा ही गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक असते. याकरिता तुम्ही बाहेर पडण्यासाठीची प्लॅनिंग अगोदरच बनवून ठेवणे गरजेचे असते.

म्हणजेच प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही ती किती वर्षांनी विकणार आहात हे ठरवून ठेवावे. तुमचे विकण्याचे जे काही टार्गेट असेल त्या अगोदर जर तुम्हाला प्रॉपर्टी विकायची असेल तर होऊ शकणाऱ्या नफा किंवा तोटा तुम्ही विचारात घ्यावा व त्यानुसार प्रॉपर्टी खरेदी करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe