मुलांना जर संपत्तीतून बेदखल केले तरी देखील ‘या’ मालमत्तेमध्ये त्यांना वाटा द्यावाच लागतो! वाचा काय सांगतो कायदा?

Ajay Patil
Published:
property law

मालमत्ता अर्थात प्रॉपर्टीच्या बाबतीत भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे असून त्या कायद्याचे पालन हे प्रत्येकाला करावे लागते. परंतु यातील बरेच कायदे अजून देखील हव्या त्या प्रमाणात आपल्याला माहिती नसतात. प्रॉपर्टीच्या बाबतीत जर पाहिले तर अनेकदा प्रॉपर्टीच्या संबंधी कुटुंबांमध्ये वाद उद्भवतात.

कधी हे वाद मुलं आणि पालकांमध्ये देखील असतात. समजा एखाद्या प्रकरणांमध्ये पालक हे मुलांना त्यांच्या मालकीच्या मालमत्तेतून बेदखल करतात व यामुळे बेदखल करण्यात आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर हक्क सांगता येत नाही.

परंतु कायद्यानुसार हा नियम प्रत्येक प्रकारच्या  मालमत्तेवर लागू होत नाही.  यामध्ये अशा काही प्रकारच्या मालमत्ता आहेत त्यामध्ये मुलांना पालकांनी बेदखल केले तरी मुलांना त्यांचा वाटा द्यावा लागतो. म्हणजेच या प्रकारच्या मालमत्ता मधून मुलांना बेदखल करता येत नाही व या प्रकारच्या मालमत्तांना वडिलोपार्जित मालमत्ता असे म्हणतात.

म्हणजेच साध्या शब्दात सांगायचे झाले तर मुलांना तुम्ही तुमच्या मालकीच्या मालमत्तेतून बेदखल केले  असले तरी देखील तुम्ही तुमच्या मुलांना वडिलोपार्जित मालमत्तेतून बेदखल करू शकत नाही. अशा प्रॉपर्टीवर दावा करण्यासाठी मुलं कोर्टाची पायरी चढू शकतात व कोर्ट देखील मुलांच्या बाजूने निर्णय देण्याची पूर्ण शक्यता अशा प्रकरणांमध्ये असते.

 वडिलोपार्जित मालमत्ता कशाला म्हणतात?

एखाद्या व्यक्तीला जर त्याचे आजोबा किंवा पणजोबांकडून संपत्ती मिळाली असेल तर अशा संपत्तीला वडिलोपार्जित मालमत्ता असे म्हटले जाते. अशा प्रकारची वडिलोपार्जित मालमत्ता  चार पिढ्या जुनी असणे गरजेचे आहे आणि या दरम्यान कुटुंबामध्ये कोणतीही फूट पडलेली नसावी.

कुटुंबामध्ये जर फूट म्हणजेच कुटुंब विभक्त झाले असेल तर मालमत्ता वडिलोपार्जित मानली जात नाही. महत्वाचे म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगा आणि मुलगी या दोघांना समान हक्क असतो. परंतु सर्व वारसा हक्क मात्र वडिलोपार्जित नसतात. यामध्ये जर आपण हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 चे कलम चार,

आठ आणि एकोणावीस चा विचार केला तर यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल तपशीलवार विवेचन केले आहे. जर मालमत्तेचे वाटणी म्हणजेच विभाजन केले तर सदर मालमत्ता ही वडिलोपार्जित संपत्ती ऐवजी स्व अधिग्रहीत मालमत्ता बनते आणि पालक अशा संपत्तीतून किंवा मालमत्तेतून मुलांना बेदखल करू शकतात.

 वडिलोपार्जित आणि वारसा यातील प्रमुख फरक काय?

वडिलोपार्जित मालमत्ता केवळ वडिलांकडूनच कुटुंबाला मिळते आणि वारसाने मिळालेली मालमत्ता म्हणून ठेवली जाऊ शकते. परंतु वारसा हक्काने मिळालेली प्रत्येक मालमत्ता वडिलोपार्जित असते असे नाही.

कारण बऱ्याचदा आजोबा किंवा पणजोबा, वडील यांच्या रांगेत नसलेली आजी, आई तसेच मामा किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाकडून मिळालेली संपत्तीला वारसा हक्क म्हणतात. परंतु अशा प्रकारचे संपत्ती ही वडीलोपार्जित नसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe