Pune Real Estate : पुण्यातील सर्वात स्वस्त फ्लॅट आणि जागा मिळेल फक्त ह्या ठिकाणी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Real Estate:- कुठलेही शहर म्हटले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गर्दी आणि त्या ठिकाणाची वाहतूक कोंडी इत्यादी गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्रास होत असतो. त्यामुळे जे लोक रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतात म्हणजेच घर वगैरे घ्यायची ज्यांना इच्छा असते असे नागरिक नेहमीच शहरातील गर्दी पासून दूर परंतु त्या ठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधा व संबंधित परिसराशी चांगली कनेक्टिव्हिटी आहे अशा ठिकाणी घराच्या किंवा इतर मालमत्तेच्या शोधात असतात.

याच अनुषंगाने जर आपण पुणे शहराचा विचार केला तर  तुमचा देखील पुणे शहरांमध्ये किंवा शहराच्या आसपास व चांगल्या सुविधा असतील अशा ठिकाणी घर वगैरे घ्यायचा प्लान असेल तर तुम्ही रियल इस्टेट डेस्टिनेशन म्हणून नावारूपाला येत असलेल्या पुण्याजवडील भुगाव या स्थानाचा विचार करू शकता. रियल इस्टेट क्षेत्रातील डेस्टिनेशनच्या दृष्टिकोनातून भूगावला का महत्व आहे? त्याबद्दलची माहिती घेऊ.

 भूगाव आहे रियल इस्टेट डेस्टिनेशन म्हणून महत्त्वाचे

पुणे शहरातील गर्दी पासून दूर व चांगल्या सुविधा असणाऱ्या ठिकाणी तुम्हाला घर घ्यायची इच्छा असेल तर भुगाव हे ठिकाण तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. हे एक नव्याने तयार झालेल्या परिसर असून रियल इस्टेट ठिकाण म्हणून हे खूप प्रसिद्ध होत आहे. भुगाव हा परिसर शेती आणि आणि शेतीसंबंधीत असलेले जोडव्यवसाय यासाठी प्रसिद्ध असून त्या ठिकाणी या गोष्टीचा खूप मोठ्या वेगाने विकास होत आहे.

तसेच या गावाशी रिंग रोड तसेच प्रमुख राज्य मार्ग, मुख्य शहराशी जोडणारे रस्ते तसेच मानस लेक, मोठ्या अशा हॉटेल्स यासारख्या अनेक कारणांमुळे या ठिकाणी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लक्ष वेधून घेत आहे. रस्ते कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर रायगड जिल्ह्यातील मुंबई ते गोवा महामार्ग माणगाव येथे जोडला जात असून व दुसरी बाब म्हणजे पुणे ते दिघी हा महामार्ग देखील या ठिकाणहुन जात असल्यामुळे या गावाला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे.

एवढेच नाही तर भुगाव हे कर्वेनगर तसेच वारजे, औंध, बाणेर, बालेवाडी तसेच डेक्कन जिमखाना इत्यादी पुणे शहरातील प्रमुख विकसित भागाशी भूगाव जोडले केले असल्यामुळे देखील या ठिकाणी खूप मोठे महत्त्व आहे. पुणे रिंग रोडच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या रिंग रोडला पुणे ते मुंबई, पुणे ते सातारा, पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर इत्यादी महामार्ग जोडले जाणार आहेत व हा रिंग रोड भूगाव मधून जात आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना पुणे या ठिकाणी सहजपणे जाता येता येणे शक्य होणार आहे.

 प्रमुख शिक्षण संस्था हॉस्पिटल आहेत जवळ

तसेच भूगावचा विचार केला तर शैक्षणिक दृष्टिकोनातून या ठिकाणी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा लवळे कॅम्पस व भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज देखील आहे. याशिवाय इतर शिक्षण संस्थांमध्ये श्री श्री रविशंकर विद्यालय, संस्कृती विद्यालय, इंडस इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल, श्री चैतन्य, सिंहगड, न्यू इंग्लिश स्कूल इत्यादी शिक्षण संस्था देखील या गावाच्या जवळच आहेत. तसेच एमआयटी कॉलेज व सिंहगड कॉलेजच्या प्रमुख शिक्षण संस्था देखील या ठिकाणी  आहेत. हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी मंगेशकर हॉस्पिटल, चेलाराम हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटल जवळच्या अंतरावर आहे.

 भुगावचे औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्व

भूगाव हे ठिकाण हिंजवडी येथील आयटी पार्क पासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर आहे. मायक्रोसॉफ्ट तसेच बार्कले, इन्फोसिस, टाटा टेक्नॉलॉजी इत्यादी सर्व प्रमुख आयटी कंपनी आहेत. या गावापासून 13 किलोमीटर अंतरावर बाणेर हे प्रसिद्ध असे कमर्शियल ठिकाण देखील आहे. या ठिकाणी अनेक मोठमोठ्या कंपन्या, मॉल्स तसेच बँक देखील आहेत. तसेच मुंबई-पुणे साताऱ्याच्या अगदी जवळ भूगाव आहे.

तसेच या रस्त्यामुळे पुणे शहरात व मुंबई ते सातारा या रस्त्यावर जाता येते. या ठिकाणी असलेल्या एनडीए चौक येथील पुल वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे वारजे तसेच बावधन व कोथरूड व सोबतच मुंबई व साताऱ्याकडून देखील कुठल्याही अडथळा शिवाय भूगावकडे आपल्याला जाता येते.

 सध्या भूगाव येथे काय आहेत फ्लॅटचे दर?

सध्या या परिसरामध्ये वन बीएचकेचा फ्लॅट घ्यायचा असेल तर त्याची किंमत 25 ते 45 लाख रुपये आहे. टू बीएचके ची किंमत 35 लाख ते 1.15 कोटी तर तीन बीएचके फ्लॅटची किंमत 60 लाख ते 3.50 कोटी पर्यंत आहे.

त्यामुळे जर गर्दी पासून दूर आणि चांगल्या कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायची इच्छा असेल तर भुगाव हे ठिकाण खूप उत्तम ठरू शकते.