Real Estate:- घर किंवा जागा किंवा फ्लॅट जेव्हा खरेदी केला जातो तेव्हा त्यामागे प्रामुख्याने गुंतवणूकदाराचे दोन उद्देश असतात. एक म्हणजे स्वतःच्या वापरासाठी अशा पद्धतीची प्रॉपर्टी विकत घेतली जाते किंवा आज खरेदी करून कालांतराने नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी खरेदीचा व्यवहार केला जातो.
दुसरा म्हणजे प्रॉपर्टीत गुंतवणूक करून ती प्रॉपर्टी भाड्याने देऊन त्या मालमत्तेतून महिन्याला निश्चित उत्पन्न मिळावे हादेखील एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यामागील उद्देश असतो.
परंतु या सगळ्यांमध्ये जर आपण बघितले तर एखादी प्रॉपर्टी व खास करून घर किंवा फ्लॅट जर भाड्याने दिला तर बऱ्याचदा भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींना धरून वाद उद्भवतात व बऱ्याचदा संबंधित मालमत्तेच्या मालकीचा प्रश्न देखील उद्भवतो व नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते व कधीकधी अशा प्रकारचे प्रकरणे कोर्टाच्या दारात देखील पोहोचतात.
हा सगळा मनस्ताप जर टाळायचा असेल तर प्रॉपर्टी किंवा घर भाड्याने देताना भाडेकरार ऐवजी लिज अँड लायसन्स म्हणजेच भाडेपट्टा आणि परवाना करार केला तर त्यामध्ये घरमालकाची देखील सुरक्षितता राहते व भाडेकरू देखील सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया कशी असते व याचे फायदे काय? याबद्दलची माहिती बघू.
लीज अँड लायसन्स म्हणजेच भाडेपट्टा व परवाना आणि भाडेपट्टा करार यामधील सारखेपणा
तसे पाहायला गेले तर तुम्ही भाडे करार केला असेल किंवा भाडेपट्टा व परवाना म्हणजेच लिज अँड लायसन्स केले असेल तर ही कागदपत्रे प्रामुख्याने प्रॉपर्टीच्या मालकाच्या हिताचे रक्षणासाठी महत्वाचे असून या दोन्ही कागदपत्रांच्या माध्यमातून संबंधित मालमत्तेचा मालक ठराविक कालावधीसाठी निवासी किंवा व्यावसायिक वापर करता यावा याकरिता एखाद्याला ती प्रॉपर्टी भाडेतत्त्वाने किंवा भाडेकरूला देत आहे असे स्पष्टपणे नमूद केलेले असते.
ज्याप्रमाणे भाडेकरारचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा काही वर्षांचा असू शकतो त्याप्रमाणे लीज अँड लायसन्सचा कालावधी देखील 11 महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत असू शकतो. यामध्ये एखाद्या भाडेकरूने जर राहण्यासाठी म्हणजेच निवासी वापराकरिता मालमत्ता भाड्याने घेतली
असेल तर ती मालमत्ता तो व्यावसायिक वापरासाठी करू शकत नाही असे देखील यामध्ये स्पष्ट केलेले असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाडेकरार असो किंवा लीज अँड लायसन्स पद्धतीचा करार असो तो ठरवलेल्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर जर वाढविला नाही तर भाडेकरूला मालमत्ता खाली करावी लागते.
भाडेपट्टा करार आणि लीज अँड लायसन्स मधील फरक
जेव्हा आपण भाडेकरार करतो तेव्हा घराच्या मालकाला लेसर असे म्हटले जाते व भाडेकरूला लेसी म्हणून संबोधले जाते. परंतु तुम्ही जेव्हा लिज अँड लायसन्स तयार करतात तेव्हा यामध्ये घर मालकाला लायसन्सर आणि भाडेकरूला लायसेन्सी असे म्हटले जाते.
भाडेकरार निवासी मालमत्ते करिता 11 महिन्यांच्या कालावधीसाठी केला जातो तर लीज एग्रीमेंट बारा किंवा अधिक महिन्याच्या कालावधीसाठी देखील केले जाते. हे प्रामुख्याने व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देण्यासाठी वापरले जाते.
याउलट भाडेपट्टी आणि परवाना दहा ते पंधरा दिवसापासून ते दहा वर्षाच्या कालावधीपर्यंत केले जाते. महत्वाचे म्हणजे ही सर्व कागदपत्रे नोटरी करून स्टॅम्प पेपरवर तयार केली जातात. परंतु यामध्ये जर भाड्याचा कालावधी 12 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांसाठी असेल तर न्यायालयात रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते.
दोघांपैकी कोणते कागदपत्र आहे फायद्याचे
लीज अँड लायसन्स म्हणजेच भाडेपट्टा आणि परवाना हे भाडे करारापेक्षा चांगले मानले जाते. यातून सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे ते किमान दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीसाठी केले जाते व दहा वर्षाच्या दीर्घ कालावधीसाठी देखील केले जाते.
यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असतो की कोणत्याही प्रकारे भाडेकरूला या मालमत्तेवर हक्क सांगता येणार नाही व त्यामुळे मालमत्ता किंवा जमीन काही काळ भाडेकरच्या ताब्यात असली तरी घर मालकाची मालकी कायम राहते.
तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांच्या संमतीने या एग्रीमेंट करारावर सही करतात आणि पक्षांपैकी एकाच्या मृत्यूनंतर उत्तर अधिकारी किंवा वारस परस्पर संमतीने हा करार चालू ठेवू शकतात. परंतु लीज अँड लायसन्स मध्ये असे करता येत नाही.
या कराराद्वारे जर दोन्ही पक्षांपैकी एकाचा जरी मृत्यू झाला तर हा करार ऑटोमॅटिक रद्द होतो. त्यामुळे तुम्ही तुमचे मालमत्ता भाड्याने देत असाल तर भाडेकरार किंवा लीज अँड लायसन्स तयार तयार करणे व नंतरच मालमत्ता भाड्याने देणे फायद्याचे ठरू शकते.
त्यामुळे भाडेकरार असो किंवा लिज अँड लायसन्स करार असो यापैकी एक जरी केलेला असेल तरी तुमच्या मालमत्तेच्या मालकीला कोणीही आव्हान देऊ शकत नाही.