Vastu Tips:- वास्तुशास्त्र हे खूप महत्त्वाचे असे शास्त्र असून घराचे बांधकाम किंवा घराच्या रचना संदर्भातले अनेक महत्त्वाच्या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे कोणतेही व्यक्ती घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करूनच सगळ्या गोष्टींची रचना घरामध्ये करत असतात.
तसेच घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि त्या नेमक्या कोणत्या दिशेला असाव्यात याबद्दलचे देखील अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये विशद केलेली आहेत व त्यानुसारच बरेच जण घराची रचना किंवा वस्तू ठेवण्याची जागा निश्चित करत असतात.
अगदी याच प्रमाणे बघितलेस तर वास्तुशास्त्रानुसार घरातील बऱ्याच वस्तूंचा संबंध हा घरामध्ये नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जेची येतो. वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरामध्ये काही वस्तू ठेवल्या तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी संचारते.
परंतु तुटलेले घड्याळ किंवा तुटलेल्या वस्तू जर घरामध्ये असतील तर त्यामुळे निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात तयार होते. अगदी याच पद्धतीने जर आपण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर काही मूर्ती अशा आहेत ज्या घरात जर ठेवल्या तर घरामध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीची कृपा राहते. तसेच बहुतेक करोडपती लोकांच्या घरात या सात मूर्ती आपल्याला आढळून येतात.
या सात मूर्ती घरात ठेवल्या तर राहते लक्ष्मीची कृपा
1- पितळ, चांदी किंवा तांब्याची हत्तीची मूर्ती– हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणले जाते व घरात हत्तीची मूर्ती ठेवल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होते व तुमचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते व त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवणे फायद्याचे ठरते.
2- तांबे, चांदी किंवा पितळेची कासवाची मूर्ती– असे म्हटले जाते की भगवान विष्णूचा दुसरा अवतार कुर्म अवतार होता. यानुसार भगवान विष्णूंचा ज्या ठिकाणी निवास किंवा वास असेल त्या ठिकाणी लक्ष्मी देवीचा देखील निवास असतो.
त्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी करोडपती लोक आपल्या घरामध्ये कोणत्याही धातूपासून तयार केलेले कासव ठेवतात व वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायामध्ये देखील वृद्धी होते.
3- कामधेनु गाईची मूर्ती– पौराणिक कथा जर बघितल्या तर यामध्ये कामधेनू गाय ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणून ओळखली जाते. कामधेनु गाईची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
वास्तुशास्त्रानुसार कामधेनु गाईच्या मूर्ती ठेवण्याचे महत्त्व बघितले तर तुम्हाला जर एखाद्या दीर्घ कालावधीपासून जीवनामध्ये काही भौतिक वस्तू मिळवण्याची इच्छा असेल तर कामधेनु गाईची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने ती इच्छा पूर्ण होते.
4- धातूचा पिरॅमिड– घरामध्ये पिरॅमिड ठेवल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. तुमच्या जर घर बांधण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही घरात धातूचा पिरॅमिड ठेवावा व त्यामुळे तुमचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. घरामध्ये क्रिस्टल किंवा धातूचा पिरॅमिड ठेवल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.
5- घुबडाची मूर्ती किंवा पुतळा– बरेच करोडपती लोक हे घरामध्ये घुबडाचा पुतळा ठेवतात. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले गेले आहे व घुबडावर लक्ष्मी देवीचा विशेष कृपाशीर्वाद असतो.
याकरिता करोडपती लोक घरामध्ये घुबडाची मूर्ती ठेवतात. घुबडाची मूर्ती घरात ठेवल्यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढते व मालमत्ता खरेदी करण्याच्या संधी देखील मिळतात.
6- गणपतीची मूर्ती– करोडपती लोकांच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवल्याचे आपल्याला नक्कीच आढळून येते. यामागील प्रमुख कारण जर बघितले तर श्री गणेशाची आराधना अडथळे दूर करणारी आणि प्रथम देवता म्हणून केली जाते.
तसेच आपल्याला माहित आहेच की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर अगोदर गणपतीचे नाव घेतले जाते व त्यामुळे घरामध्ये जर गणपतीची मूर्ती ठेवली तर कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येत नाही आणि प्रगती होते.