file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कामीका एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाच्यावतीने नेवाश्यात बंद ठेवण्या बाबतचा शासकीय आदेश काढला होता. मात्र प्रशासनाच्या आदेशाला काही व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवल्याप्रकरणी प्रशासनाने कारवाई केली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणार्‍या 12 व्यावसायिकांवर कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दुकानांवर कारवाईचा बडगा अल्ताफ पिंजारी, जिजाबापू जाधव (संदीप बेकर्स), मनोज पारखे (ओम हार्डवेअर), कैलास वाखुरे (मध्यमेश्वर केक शॉप), ताराचंद परदेशी (श्रावणी पान स्टॉल), रेणुका डांगरे (डांगरे बँगल्स), गोरख घुले (राजहंस केक शॉप) तसेच नेवासा फाटा येथील रवींद्र उकिरडे (रवींद्र किराणा), भगवती गुजर (शिवशक्ती आइस्क्रीम),

सोपान पंडित (ज्ञानेश्वर वडापाव), अल्ताफ कुरेशी (एजाज मटण शॉप), सोमनाथ खंडेलवाल (खंडेलवाल ट्रेडर्स) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

कामीका एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाच्यावतीने मंगळवार दि.3ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते गुरुवार दि.5 ऑगस्ट सकाळ 8 पर्यंत नेवासा शहर व नेवासा फाटा येथील दुकाने तसेच वाहतूक बंद ठेवण्याबाबतचा प्रशासनाने आदेश काढला.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस पथक नेवासा शहर व नेवासा फाटा परिसरात गस्त घालत असताना नेवासा शहरातील वरील काही दुकाने सुरू असताना आढळून आली. या व्यावसायिकांच्या विरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.