file photo

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगरचे जिल्हाधीकारी राहुल द्विेदी यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची नवी नियमावली रविवारी रात्री घोषित केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशीराहणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा फिरण्यासाठी चार तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सायंकाळी सातऐवजी रात्री नऊपर्यंत आता फिरायला मोकळीक राहणार आहे.

२२ मे पासून सुरू झालेली सलूनची दुकाने मात्र पुन्हा बंद करण्यात आली आहेत. हा नियम ३० जूनपर्यंत लागू असणार आहे. लॉकडाऊन-०४ मध्ये सायंकाळी सात ते सकाळी सात फिरण्यास निर्बंध घालण्यात आले होते.

ते आता चार तासांनी शिथील केले असून रात्री नऊपर्यंत फिरण्यास मोकळीक राहणार आहे. पूर्वी सकाळी सातनंतर फिरता येत होते, आता सकाळी पाचपासूनच फिरता येणार आहे. मॉर्निंग वॉकला परवानगी दिल्याने ही वेळ वाढविण्यात आली आहे.

या गोष्टींवरील बंदी कायम –

सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई राहील.शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्‍था/ प्रशिक्षण संस्‍था/ कोचींग क्‍लासेस इत्‍यादी बंद राहतील. तथापी आॅनलाईन /दुरस्‍थ: शिकवणी यास परवानगी राहील.

केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्‍या हवाई प्रवासी वाहतुक व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारची आंतरराष्‍ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. स्‍वतंत्र आदेश आणि एसओपीव्‍दारे अनुमती दिलेल्‍या व्‍यतिरिक्‍त रेल्‍वे प्रवासी वाहतूक व देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.

सिनेमा हॉल्‍स, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्‍सम ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्‍यादीसाठी सार्वजनिकरित्‍या एकत्र येण्‍यास मनाई राहील.

सर्व प्रकारचे धार्मिक स्‍थळे/ प्रार्थना स्‍थळे नागरिकांच्‍या प्रवेशासाठी बंद राहतील.कटिंग सलून, स्‍पा, ब्‍युटीपार्लर बंद राहतील.
शॉपिंग मॉल्‍स, हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट व आदरातिथ्‍य सेवा बंद राहतील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews