Sarkari Yojana : अलीकडे भारतात औषधी वनस्पतीची (Medicinal Crops) शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेष म्हणजे औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी जाणकार लोक शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असून मायबाप शासन (Government) देखील वेगवेगळ्या योजनांच्या (Sarkari Yojana) माध्यमातून औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे.

खरं पाहता अलीकडे भारताबरोबरच संपूर्ण जगानेही आयुर्वेद, वनौषधी आणि आयुष पद्धती स्वीकारल्या आहेत. त्यामुळेच देश-विदेशात औषधी वनस्पती आणि वनौषधींची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना औषधी वनस्पतींची शेती मोठ्या फायद्याची ठरत आहे.

यामुळे औषधी वनस्पतींची लागवड (medicinal plant farming) करून भारतीय शेतकरी आर्थिक प्रगती साधत आहेत. जाणकार लोक माहिती याबाबत देताना सांगतात की, भारताची शेतजमीन आणि हवामान औषधी वनस्पती किंवा वनौषधींच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहे.  यामुळे भारतात अगदी प्राचीन काळापासून औषधी वनस्पतींची शेती केली जात आहे. अलीकडे यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या अनुषंगाने शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजनांवर (Agriculture Scheme) एकत्रितपणे काम करत आहेत. या योजनांतर्गत (Farmer Scheme) शेतकऱ्यांना विविध वनौषधी वाढवण्यासाठी 75 टक्के अनुदान (subsidy) देखील दिले जात आहे. त्यामुळे निश्चितच देशात औषधी वनस्पतींच्या शेतीला चालना मिळणार असून शेतकरी बांधवांना (Farmer) याचा मोठा फायदा होणार आहे.

औषधी शेतीसाठी 75% पर्यंत अनुदान मिळतं बर…!

भारतातील औषधी वनस्पती आणि वनौषधींचे उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय आयुष मिशन (NAM) नामक एक महत्त्वाकांक्षी योजना चालवली जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय आयुष मिशन या योजनेंतर्गत 140 प्रकारच्या वनौषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दराने अनुदान दिले जात आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लागवडीच्या खर्चावर 30 टक्के ते 50 आणि 75 टक्के आर्थिक अनुदान देण्यात येत आहे. आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत, 59,350 हून अधिक शेतकऱ्यांना औषधी वनस्पती आणि वनौषधींच्या उत्पादनासाठी आर्थिक मदत मिळाली आहे.

राष्ट्रीय आयुष मिशन या योजनेतील लक्षात घेण्यासारख्या बाबी 

राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत, केवळ पारंपारिक औषध पद्धतींनाच प्रोत्साहन दिले जात नाही, तर शेतकऱ्यांना कमी खर्चात औषधी शेती करण्यासही प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेंतर्गत आर्थिक अनुदानाची तरतूद असून, शेतीसोबतच मार्केटिंगसाठीही शासकीय मदत दिली जाते.

शेतकऱ्यांच्या जमिनीवर प्राधान्याने औषधी वनस्पतींची लागवड करणे.

शेतीसाठी उत्तम दर्जाची लागवड साहित्य निर्मिती आणि पुरवठा करण्यासाठी बॅकवर्ड लिंकेज असलेल्या रोपवाटिकेची स्थापना.

फॉरवर्ड लिंकेजसह औषधी पिकांचे व्यवस्थापन.

औषधी पिकांची प्राथमिक प्रक्रिया, पॅकेजिंग आणि विपणन यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.

येथे औषधी वनस्पती खरेदी आणि विक्री करता येतात बर 

भारतातील बहुतेक शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी फार्मास्युटिकल कंपन्यांशी करार करतात. वस्तुत: औषधी वनस्पतींचे उत्पादन आणि विक्रीचे बाजारभाव नसल्यामुळे कंत्राटी शेतीला प्राधान्य दिले जात आहे. अशाप्रकारे औषधी कंपन्या स्वत: शेतकऱ्यांकडून वनौषधी विकत घेतात आणि मार्केटिंगची चिंता संपते.

मात्र जर शेतकऱ्यांना हवे असेल तर ते ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे औषधी वनस्पती खरेदी आणि विक्री देखील करू शकतात. यासाठी केंद्र सरकारने ई-चरक मोबाईल अॅप्लिकेशनही सुरू केले आहे. हे शेतकरी, औषधी कंपन्या, घाऊक विक्रेते तसेच इतर भागधारकांना औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे विपणन प्रदान करण्यास मदत करते. निश्चितच भारत सरकारच्या या योजनेमार्फत शेतकऱ्यांना फायदा होणार असून यामुळे देशात औषधी वनस्पतींच्या शेतीस चालना मिळणार आहे.