file photo

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-  दीड महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादीच्या एक वरच्या फळीतल्या पदाधिकार्‍याचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण सर्वत्र प्रसारित झाले होते.

आजही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते एकमेकाला मोठ्या चवीने हे व्हिडिओ दाखवतात असा गौप्यस्फोट उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी केला आहे. युवानेते विवेक कोल्हे यांच्याबद्दल अनेकांनी गरळ ओकल्यानंतर आरिफ कुरेशी यांनी समाचार घेतला.

ते म्हणाले की, व्यक्तीगत पातळीवर युवकाचे एका हॉटेल चालकाशी झालेले वाद-विवादाचा आधार घेऊन युवानेते विवेक कोल्हे यांच्याबद्दल घसरू पाहणार्‍या राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांचे कोल्हे कुटुंबाकडून कालपर्यंत खाल्लेले अद्याप दातातून निघाले नाही.

त्यांनी बालिश लोकप्रियता मिळवण्यासाठी नाहक धडपड करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या चौकातील मारामारीच्या भाषेमुळे त्यांची जनमानसात कोंडी झाली. शहराच्या पाणी प्रश्नावर आमदार आशुतोष काळे यांनी केलेली फसवणूक उघड झाली.

यामुळेच विरोधक बेतालपणाची वक्तव्य करून नवाज कुरेशी यांना बोलके बाहुले करून वापरले जात आहे असे ते म्हणाले. पक्षीय संस्कृतीचा विचार करायचा झाला तर दीड महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादीच्या एक वरच्या फळीतल्या पदाधिकार्‍याचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण सर्वत्र प्रसारित झाले होते.

आजही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते एकमेकाला मोठ्या चवीने हे व्हिडिओ दाखवतात हे नवाज कुरेशी विसरले असावेत. संस्कारांचीच तुलना करायची असल्यास असे एक नाही अनेक व्हिडिओ तुमच्या पदाधिकार्‍यांचे जनतेसमोर ठेवता येऊ शकतात व त्या कृत्याच्या पाठीमागे तुमचे नेतेच आहेत का? असाही प्रश्न उभा राहतो.

कुणाच्या पक्षाचे व नेत्यांचे काय हीन पातळीचे संस्कार आहेत हे नागरिकांना चांगले कळलेले आहे. अशा घटनांचे संदर्भ आमदार काळेंच्या संस्काराशी जोडून बोलता येऊ शकते. मात्र कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध राजकीयदृष्टीने जोडणे कोल्हे कुटुंंब करत नाही असेही ते म्हणाले.