file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा लागू झाला नाही. नुकसान झाल्याबरोबर दिलेल्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज दाखल केले होते. या शेतकऱ्यांसाठी २२ लाख रुपये विमा लागू झाला आहे. शेवगाव तालुक्यावर अन्याय केल्याचा आरोप शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केला आहे.

गतवर्षी खरीप हंगामातील बाजरी,कपाशी, मूग, तूर, भुईमुग आदि पिकांसाठी तालुक्यातील ४४ हजार २६१ शेतकऱ्यांनी २१ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रासाठी १ कोटी ९१ लाख ३४ हजार ११४ रुपये विमा रक्कम स्वंरक्षित केलेली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पाऊस झाल्याने खरीप व रब्बी अशा दोन्ही हगांमातील पिक वाया गेले आहे.

उत्पन्न हाती आले नाही आणी खर्चही गेला अशी हालाखी झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार रुपये मदत दिली.पिंकाचे नुकसान झाल्याने विमा स्वंरक्षीत केलेल्या पिंकाचा विमाही मिळेल अशी अपेक्षा होती.

पिकांचे नुकसान झाल्यास विम्याचा हातभार लागेल या अपेक्षेवर शेतकरी विमा स्वंरक्षीत करतात पंरतु गतवर्षी नुकसान होऊनही तालुक्यास विमा लागू झाला नाही.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या कालावधीत विमा कंपनीकडे पिक नुकसानीची तक्रार केली अशा फक्त ५३२ शेतकऱ्यांसाठी २२ लाख २९ हजार ३६ रुपये विमा लागु झाला आहे.

हा शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर विमा कंपनीने अन्याय केला असुन शेतकऱ्यांची आर्थिक लुट केल्याचा आरोप पंचायत समिती सभापती क्षितिज घुले यांनी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यास साडेआठ कोटी रुपये विमा मंजूर झाल्याची माहिती मिळताच पुर्ण माहिती न घेताच त्याचे श्रेय घेण्यास चढाओढ झाली.