अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डी शहरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या ‘निमगाव ‘ या गावात एकाच घरातील पाच जण कोरोनाग्रस्त निघाले असून परिसरात भीती पसरली आहे.

प्रशासनाने यावर कार्यवाही करत चौदा दिवस शंभर टक्के लॉकडाऊन घोषित करून संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. या गावातील ५० वर्षीय महिलेचा भाजी विक्री व्यवसाय आहे.

शेजारच्या राहाता तालुका मार्केट कमिटीच्या घाऊक बाजारातून भाज्या खरेदी करून त्याची विक्री निमगाव येथे त्या करतात. त्याच कोरोनाग्रस्त निघाल्याने तहसीलदार कुंदन हिरे यांनी त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सर्व २९ जणांना ताब्यात घेतले आहे.

भाजी विक्री करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील दोन पुरुष, दोन महिला व एक चार वर्षांची बालिका यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे.

त्यासाठी सात वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. तसेच करोना पॉझिटिव्ह असलेल्या भाजी विक्रेत्या महिलेमुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने राहाता बाजार समितीत काम करणारे आवडते, हमाल, तसेच व्यापारी यांची करोना तपासणी मोहीम तातडीने सुरू केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews