file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोर्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत.

नुकतेच श्रीरामपूर शहरातील मदर तेरेसा चौक परिसरात राहणारे गफुरखान पठाण यांच्या मालकीच्या जागेवर वीस वर्षापासून त्यांच्या घरासमोर चंदनाचे झाड होते.

या चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. पठाण यांच्या घराशेजारील घरांच्या कड्या लावून व शेजारील राहणाऱ्या लोकांची घराची बाहेरून दरवाजे लावुन चोरट्यांनी चोरी केली.

हे चोरटे झाडाचा गाभा /खोड कापून घेऊन गेले आहे अशी माहिती पठाण यांनी दिली आहे. सदर चंदनाच्या झाड चोरी बाबत पठाण यांनी शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी हापसे यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज सादर केला आहे.

दरम्यान एकीकडे जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असताना दुसरीकडे मात्र पोलिसांकडून अपेक्षित कारवाया होत नसल्याचे समोर येत आहे.