अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- राहुरी पोलीस स्टेशनचे पीआय नंदकुमार दुधाळ यांनी दुकान उघडे ठेवले या कारणावरून नवी पेठ राहुरी येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यास चापट मारल्याने व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली.

यानंतर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, डॉ.विजय मकासरे यांच्यासह व्यापाऱ्यांनी राहुरी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलनावर पडदा पडला.

शनिवार-रविवार शासनाचा लोक डाऊन असल्याने पेठेतील दुकाने बंद राहतात नवी पेठ भागातील एक मिठाईचे दुकान उघडे दिसले असताना पोलीस निरीक्षक दुधाळ व त्यांचे सहकारी गावातून पाहणी तरी फिरत असताना सदर व्यापाऱ्याचे दुकान उघडे दिसल्यावर त्यास त्यांनी बोलावून घेतले व दंड भरण्यास तयार आहात का दहा हजार रुपये दंड होईल असे सांगतात सदर व्यापाऱ्याने माझी आवराआवर चालू आहे आता दुकान बंद करणार आहे,

असे असे सांगतानाच पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी गाडीतून उतरून सदर व्यापाऱ्याच्या तोंडात मारल्याने वातावरण संतप्त झाले.

याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्यापारी वर्ग एकत्र येऊन पोलीस स्टेशन वर जमा झाला आपण कोणत्या नियमातून सदर व्यापाऱ्यास मारले एक वेळ दंड करा पण महाराणीचे कारण काय अशी विचारणा करून संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी माफी मागितली.

याशिवाय उठणार नसल्याचा इशारा दिला त्यानंतर व्यापार्यांचा समोर येऊन दुधाळ यांनी माफी मागितल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला यापूर्वीही अशाच प्रकारे आझाद चौकात एका माजी नगरसेवकावर दुधाळ यांनी अरेरावी केली होती सततच्या लॉक डाऊन मुळे व्यापारी वर्ग पूर्णपणे अडचणीत आला असताना प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा याप्रमाणे अवमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा व्यापाऱ्यांनी निषेध नोंदवला.

तसेच माफी न मागितल्यास सर्व व्यापार यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्यावर चर्चा करून निर्णय घेऊ उद्यापासून राहुरी व्यापारी पेठ बेमुदत बंद ठेवण्यात येईल येईल असा इशारा दिल्यानंतर पीआय दुधाळ यांनी माफी मागितली असे समजते.

यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार,बाळासाहेब मुंडे, विलास तरवडे, प्रकाश पारख, केमिस्ट असोसिएशनचे नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, अनिल सबलोक, संजय बेदमुथा आदींसह व्यापारी उपस्थित होते.