Soybean Bajar Bhav : या वर्षी पावसाचा (Rain) लहरीपणा शेतकऱ्यांचा (Farmer) जिव्हारी लागला आहे. खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक कापूस आणि सोयाबीन जास्तीच्या पावसामुळे खराब झाले आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला (Soybean Crop) मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) वाढ होण्याची आशा आहे.

मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची आशा फोल ठरत असल्याचे चित्र आहे. सध्याचे बाजारपेठेतील चित्र पाहता सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Market Price) रोजाना घसरण होत आहे. एवढेच नाही तर भविष्यात देखील सोयाबीनच्या बाजारभावात घसरण होणार असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले गेले आहे.

काही तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सोयाबीनचे भाव साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. वायदे बाजारातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य मध्य प्रदेश मध्ये या वर्षी चार टक्के सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे.

एवढेच नाही तर राजस्थान मध्ये देखील सोयाबिनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील कोटा जिल्हा हा सोयाबीन उत्पादनासाठी संपूर्ण जगात ओळखला जातो. मात्र कोटा जिल्ह्यात देखील अवकाळी पावसामुळे सोयाबिनच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के घट घडणार असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे. मात्र असे असले तरी या वर्षी भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.4 टक्के अधिक सोयाबीन उत्पादन होणार आहे.

एवढेच नाही तर त्यात सध्या 3.25 मिलीयन मेट्रिक साठा सोयाबीनचा शिल्लक असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. या दोन्ही बाबींचा विचार करता सध्या सोयाबीन बाजारात सोयाबीनची मागणी कमी असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. या दोन कारणांमुळे आगामी काही दिवसात सोयाबीनच्या बाजार भावात अजून घसरण होण्याची शक्यता जाणकार लोकांनी नमूद केले आहे.

सध्या सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी भाव मिळत आहे. एवढेच नाही तर आगामी काही दिवसात हा भाव साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा खाली येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना याचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबिनच्या उत्पादनात या वर्षी घट होणार असल्याचा दावा केला आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन महिन्यात सोयाबीन बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतो यावर या हंगामात सोयाबीन बाजाराचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्यातरी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना बाजारभावात घसरण होत असल्याने मोठ आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.